Raksha Bandhan Maharashtra food : नारळाचे ७ पारंपरिक पदार्थ, जुन्या काळातले हे पदार्थ आजही करायला सोपे
Updated:August 6, 2025 12:35 IST2025-08-06T12:29:27+5:302025-08-06T12:35:10+5:30
Raksha Bandhan Maharashtra food: 7 traditional coconut dishes, easy to make and tasty : नारळाचे खास पारंपरिक पदार्थ. नक्की करुन पाहा. चव, पद्धत सारेच मस्त.

महाराष्ट्रात घरोघरी नारळ वापरला जातो. भाजी, आमटी सगळ्यात नारळ घालायची पद्धत अनेक ठिकाणी आहे. तसेच नारळाचे काही खास पदार्थ ही केले जातात. असे काही पदार्थ आहेत ज्याला नारळाशिवाय चवच येणार नाही.
असे काही पारंपरिक पदार्थ पाहा. जे आजकाल फार कमी केले जातात. मात्र वर्षानुवर्षे फार लोकप्रिय आहेत. यातील आवडणारे पदार्थ नारळीपौर्णिमेला नक्कीच करुन पाहा.
नारळाचा अगदी पारंपरिक पदार्थ म्हणजे नारळाच्या वड्या. मऊ आणि चविष्ट अशा या वड्या घरोघरी केल्या जातात. प्रसादासाठी केल्या जातात. तसेच स्वीट डिश म्हणूनही खाल्या जातात.
नारळाचे पेढे कधी खाल्ले का? फार छान लागतात. मात्र साखर न वापरता त्यात गूळ वापरायचा असतो. गूळ आणि नारळाचे मिश्रण तसेच इतर काही पदार्थ घालून हा पदार्थ केला जातो.
मोदकाचे सारण नारळाशिवाय तर होऊनच शकत नाही. मोदकांचे अनेक प्रकार आजकाल आले आहेत, मात्र पारंपरिक उकडीचे मोदक करायला नारळच हवा. सारण नारळाचे केले जाते.
पिक्या केळीचे नारळाचे सारण भरुन गोड पदार्थ केला जातो. तसा फार प्रसिद्ध असा हा पदार्थ नाही. मात्र एकदा नक्की करुन पाहा. केली आणि नारळ तुपावर परतून त्यात साखर घालायची. पोळीशी एकदम मस्त लागते.
सोलकढीचे नाव ऐकल्यावर लगेच तोंडाला पाणी सुटते. सोलकढीसाठी ताजा छान नारळ वापरायचा. मस्त थंडगार आणि पोटासाठी औषधी अशी सोलकढी महाराष्ट्रात घरोघरी केली जाते.
नारळाची चटणी हा एक पारंपरिक पदार्थ आहे. कोणत्याही सणाला किंवा कार्याला स्वयंपाकात या चटणीचा समावेश असतोच. कोथिंबीर, हिरवी मिरची घालून छान अशी हिरवी नारळाची चटणी केली जाते.
नारळाच्या दुधातलं घाटलं हा पदार्थही महाराष्ट्रातलाच. ही नारळाची खीर असते. नारळाचे दूध काढून त्यात गूळ वगैरे घालून हा पदार्थ केला जातो.