1 / 6१. राखीपौर्णिमेच्या दिवशी घरी येणाऱ्या भाऊ- बहिणींसाठी काय बेत करावा, हे समजत नसेल, तर या बघा काही खास आयडिया.. यातलं जे कॉम्बिनेशन आवडेल त्यापद्धतीने चमचमीत जेवणाचा बेत करू शकता..2 / 6२. पुरी- भाजी आणि मसालेभात हा एक झकास बेत होऊ शकतो. बटाट्याची भाजी हवं तर बटाटे उकडून करता येते किंवा मग रस्सा भाजी करता येते. दोन्ही भाज्या पुऱ्यांसोबत छानच लागतात. याच्या जोडीला मसालेभात करा.. याच्यासोबत गोड पदार्थ म्हणून श्रीखंड, आम्रखंड विकत आणता येईल. तसंही श्रीखंड- पुरी हे देखील एक हिट कॉम्बिनेशन आहेच..3 / 6३. पावभाजी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. बहुतांश लोकांचा हा अतिशय आवडीचा पदार्थ. त्यामुळे राखीपौर्णिमेला रात्रीच्या जेवणासाठी तुम्ही पावभाजी आणि पुलाव असं कॉम्बिनेशन करू शकता. तयारीसाठी थोडा अधिक वेळ असेल तर स्टार्टर म्हणून सूप करून टाका. आणि यासोबत गोड काय करावं, असा प्रश्न पडला असेल तर गुलाबजाम विकत आणा. म्हणजे मग वेळही वाचेल.4 / 6४. पोळी- भाजी असा बेत करायचा असेल तर शेवभाजी किंवा मग एखादी पंजाबी स्टाईल भाजी करा.. यात तुम्ही पालक पनीर, काजू करी, काजू मसाला, मिक्स व्हेज अशा छान चवदार भाज्या करू शकता. यासोबत जीरा राईस आणि दाल तडका हे कॉम्बिनेशन बेस्ट ठरेल. गोड पदार्थांसाठी बासुंदी, रबडी- जिलेबी यांचा विचार करू शकता.5 / 6५. एकदमच हटके कॉम्बिनेशन पाहिजे असेल आणि जेवणारे सगळेच तरुण असतील, तर चायनिज बेतही सगळ्यांना आवडू शकताे. त्यासाठी फ्राईड राईस, हक्का नूडल्स आणि मन्चुरियन असा बेत करू शकता. या मेन्यूला सूट होणारा गोड पदार्थ म्हणजे गुलाबजाम आणि आईस्क्रिम यांचं एकत्रित कॉम्बिनेशन.6 / 6६. व्हेज बिर्याणी, पनीर बिर्याणी आणि त्याच्या जोडीला रायता... हे कॉम्बिनेशनही अनेकांच्या आवडीचं आहे.. त्या जोडीला गोड पदार्थ म्हणून रसगुल्ला किंवा मग फ्रुट सलाड असा बेत ठेवू शकता. स्टार्टरला एखादं सूप असलं की बेत कम्प्लिट झाला..