Join us

दिवाळीचा फराळ झटपट होण्यासाठी खास टिप्स! गडबड - गोंधळ न होता, पदार्थ न बिघडता करा झटकेपट पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2025 09:30 IST

1 / 10
दिवाळी म्हटलं की घरामध्ये दुप्पट उत्साहाने काम करण्याची लगबग सुरू होते. घराची (how to make diwali faral quickly) साफसफाई, खरेदी, रोषणाई आणि या सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे दिवाळीचा खास फराळ तयार करणे! चकली, शंकरपाळी, करंजी आणि लाडू... इतके पदार्थ तयार करायला खूप वेळ आणि मेहनत लागते. अनेक गृहिणींना फराळ लवकर आणि व्यवस्थित पूर्ण करण्याचे टेंन्शन येतेच.
2 / 10
पण टेंन्शन घेऊ नका! पदार्थ तयार करताना जर काही स्मार्ट आणि 'टाईम सेव्हिंग' टिप्स (homemade diwali faral in less time) वापरल्या, तर आपला फराळ अगदी कमी वेळेत, परफेक्ट आणि झटपट तयार होऊ शकतो. वेळेचे नियोजन करण्यापासून थोडीफार पूर्वतयारी आधीच करून ठेवण्यापर्यंतच्या काही खास युक्त्या वापरून पहा. आपले फराळाचे काम नक्कीच झटपट होईल...
3 / 10
फराळातील नेमके कोणकोणते पदार्थ तयार करायचे याची आधी एक यादी करा. यादी प्रमाणे आपण जितके पदार्थ करणार आहोत त्याची पूर्वतयारी आधीच करुन ठेवा.
4 / 10
गोडाचे पदार्थ आणि तिखटाचे पदार्थ असे वर्गीकरण करा. ज्या दिवशी गोडाचे पदार्थ करणार त्या दिवशी एकदम एकाच वेळी २ ते ३ पदार्थ करावेत याचप्रमाणे तिखट पदार्थ देखील एकाच दिवशी करावे. अशा पदार्थांसाठी लागणारे साहित्य थोडेफार सारखेच असल्याने घाई - गडबड होत नाही.
5 / 10
फराळाला सुरूवात करण्यापूर्वी लागणारे साहित्य बेसन, रवा, तूप, तेल, मसाले व्यवस्थित मोजून मापून ठेवा. त्यामुळे फराळ तयार करताना वेळ वाचतो.
6 / 10
चकलीची भाजणी, शंकरपाळ्यांचे किंवा शेवचं पीठ आधीच तयार करुन हवाबंद डब्यात ठेवलं, तर आयत्यावेळी कामाचा ताण कमी होतो.
7 / 10
तळण्यासाठी जास्त घेर असलेली मोठी पसरट, खोलगट कढई वापरा. यामुळे एकाच वेळी जास्त पदार्थ तळता येतात.
8 / 10
कुटुंबातील सदस्यांमध्ये कामे वाटून घ्या. एकाने पीठ मळावे, एकाने चकली पाडावी आणि तिसऱ्याने तळण्याचे काम करावे.
9 / 10
काही पदार्थ तळताना इतरांचे मिश्रण तयार करा, उदा. शेव तळताना करंजीचं सारण बनवा. यामुळे वेळेची बचत होते आणि पदार्थ झटपट करता येतात.
10 / 10
तळलेले पदार्थ पूर्णपणे थंड झाल्यावर लगेच हवाबंद डब्यात साठवून ठेवा. यामुळे त्यांची चव आणि कुरकुरीतपणा टिकून राहतो.
टॅग्स : दिवाळी २०२५अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.