1 / 7ओली हळद आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते. ती जर आपण नियमितपणे खाल्ली तर पचनक्रिया चांगली होते. रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठीही उपयुक्त ठरते.2 / 7याशिवाय ओल्या हळदीमध्ये असणाऱ्या ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटकांमुळे त्वचेच्याही अनेक तक्रारी दूर होतात. त्यामुळे त्वचा नितळ, सुंदर होते. हिवाळ्यात तर ओली हळद खाणं खूप फायदेशीर मानलं जातं.3 / 7आता ओली हळद खाण्याचा एक चटपटीत मार्ग म्हणजे तिचं इंस्टंट लोणचं करणे आणि ते खाणे (olya haldicha loncha). लोणचं करण्याची रेसिपी अतिशय सोपी असून हे लोणचं खूप चवदार होतं. तसेच ८ ते १० दिवस चांगलं टिकतं.(Fresh Turmeric Pickle recipe)4 / 7त्यासाठी ओली हळद स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्या. यानंतर तिचे अगदी बारीक बारीक काप करा.5 / 7आता एका भांड्यात ओल्या हळदीचे काप टाकल्यानंतर त्यामध्ये बाजारात विकत मिळणारा लोणचं मसाला, चिमूटभर हिंग आणि चवीनुसार लाल तिखट, मीठ घाला.6 / 7यानंतर त्यामध्ये लोणच्याच्या प्रमाणानुसार लिंबाचा ताजा रस घाला. सगळं मिश्रण व्यवस्थित हलवून घेतलं की ओल्या हळदीचं चटपटीत लोणचं झालं तयार..7 / 7