Join us

पाहा झटपट कणीक मळण्याची भन्नाट युक्ती, वेळही कमी लागतो, कणिकही होते मऊसूत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2025 08:38 IST

1 / 8
सकाळी उठल्या उठल्या स्वयंपाकघरामध्ये सर्वात कठीण ( how to knead super soft dough ) आणि कंटाळवाणे काम म्हणजे कणिक मळणे. कणिक मळण्यासाठी सकाळचा बराच वेळ घालवावा लागतो. रिणामी चपात्या कडक होणे वातड होणे अशा अनेक समस्या उद्भवतात. मऊ, लुसलुशीत चपात्या बनवण्यासाठी आपण कणिक कोणत्या पद्धतीने मळतो हे देखील तितकेच महत्वाचे असते.
2 / 8
कणिक मळणे हे काही फारसे अवघड (new 6 method of kneading the roti dough in 1 minute) काम नाही. परंतु त्याची एक विशिष्ट्य पद्धत आहे. ही पद्धत लक्षात ठेवून जर आपण कणिक मळली तर कणिक मळायला वेळही कमी लागतो. तसेच कणिकही मऊसूत मळून होते. यासाठीच कणिक मळण्याच्या काही सोप्या ट्रिक्स लक्षात ठेवूयात.
3 / 8
कणिक मळण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा. कोमट पाण्यामुळे पीठ लवकर आणि चांगले मळले जाते. याचबरोबर, पीठ मऊ होते आणि मळण्यासाठी लागणारा वेळही कमी लागतो.
4 / 8
पराठ्यांसाठी कणिक भिजवताना दही - दुधाचा वापर करावा. कणिक झटपट मळून तयार होण्यासाठी दही - दुधातील ओलावा उपयोगी ठरतो.
5 / 8
कणिक भिजवताना तेल - तुपाचा वापर करणे गरजेचे असते. यामुळे कणिक पटकन आणि मऊसूत भिजवली जाते. तेल तुपामुळे कणिक घट्ट मळली जाऊन अधिक चांगल्या प्रकारे पीठ मळले जाते.
6 / 8
दररोज पीठ मळण्याचा त्रास टाळण्यासाठी प्रिमिक्स पीठ एकदाच तयार करुन ठेवणे हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे फक्त वेळेचीच बचत होते असे नाही तर कणिक मळणे देखील सोपे जाते. प्रिमिक्स पीठ तयार करण्यासाठी गव्हाच्या कोरड्या पिठात तेल आणि मीठ मिक्स करुन हे पीठ एका हवाबंद डब्यांत स्टोअर करुन ठेवा. गरज लागेल तसे हे तयार प्रिमिक्स घेऊन कोमट पाण्यांत भिजवून मळून घ्यावे.
7 / 8
कोरड कणिक खोलगट भांड्यात घेऊन त्यात योग्य त्या प्रमाणात पाणी घालून कणिक न मळता फक्त ओली करुन घ्यावी. ओली केलेली कणिक चमच्याने ढवळून घ्यावी. त्यानंतर त्यावर झाकण ठेवून कणिक २० मिनिटांकरता झाकून ठेवावी. २० मिनिटानंतर गरज असेल तर किंचित पाणी घालावे तसेच तेल घालून कणिक केवळ मिनिटभरासाठी मळून घ्यावी. कणिक पाणी शोषून घेऊन आपोआप मऊ होते. अशी पाणी शोषून घेतलेली कणिक मळण्यासाठी सोपे जाते. त्यामुळे भिजत ठेवलेली कणिक लगेच २ ते ३ मिनिटांत मळून होते.
8 / 8
मिक्सरच्या भांड्यात गव्हाचे पीठ ओतून त्यात गरजेनुसार पाणी व तेल घालावे. आता मिक्सरचे झाकण लावून मिक्सर सुरु करावा. मिक्सर आधी हळूहळू फिरवून घ्यावा. मिक्सरच्या भांड्यात हळूहळू पिठाचा गोळा तयार होताना दिसेल. कणिक संपूर्णपणे मळून झाल्यानंतर, मिस्कर मधून कणकेचा गोळा बाहेर काढून घ्यावा. त्यानंतर आवश्यकतेनुसार, त्याला तेल लावून हाताने हलकेच मळून घ्यावे.
टॅग्स : अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.