Join us

बटाटे उकडवताना टाळा ‘या’ चुका, बटाट्याची साल निघते पण आतून राहतो कच्चा, पोषणही मिळत नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2025 17:35 IST

1 / 6
भारतीय जेवणात बटाट्यांची भाजी खूप खाल्ली जाते. मग ते कोरडी असो वा रस्सेदार असो. बरेच लोक बटाट्याचे पराठे खातात, कुणी भजी खातात, तर कुणी आणखी कशा पद्धतीनं खातात. मात्र, हे नक्की की बटाटे भरपूर खाल्ले जातात. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच बटाटे वेगवेगळ्या पद्धतीनं आवडतात. पण बटाटे उकडताना एक चूक जास्तीत जास्त घरात केली जाते. बटाटे लवकर सोलता यावे म्हणून काही ट्रिकही केल्या जातात. पण नंतर बटाटे आतून कच्चेच राहतात. अशात बटाटे उकडताना ५ गोष्टींची काळजी घेतली पाहिजे.
2 / 6
बऱ्याचदा पाण्याचा अंदाज चुकतो त्यामुळे बटाटे जास्त शिजतात आणि मग तुटू लागतात. अशात बटाटे जास्त शिजले असतील तर फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवा. असं केल्यानं बटाटे टाइट होतील आणि बाहेरचा भाग तुटणार नाही. बर्फाच्या पाण्यात ठेवल्यानंही फायदा मिळतो.
3 / 6
बटाट्याची साल सहजपणे काढण्यासाठी लोक ते गरम पाण्यात उकडण्यासाठी ठेवतात. यानं बटाट्याचा वरचा भाग लवकर शिजतो, पण आतून कच्चाच राहतो. त्यामुळे बटाटे थंड पाणी टाकूनच उकडा.
4 / 6
किचनमधील मीठ कुकिंग हॅक्ससाठी फार कामात पडतो. जर बटाटे शिजल्यावर तुटत असतील तर कुकरच्या पाण्यात चिमुटभर मीठ टाका. यानं बटाट्याचा थर कडक होईल.
5 / 6
कूकरमध्ये जास्त बटाटे उकडताना जास्त पाणी टाकण्याची चूक करू नये. इतकंच पाणी टाका जे ४ शिट्यांमध्ये संपेल. मीडिअम गॅसवर बटाटे उकडा. यानं बटाटे तुटणार नाही. कमी बटाट्यांसाठी एक शिटी पुरेशी आहे.
6 / 6
टॅग्स : अन्नकिचन टिप्स