By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 20:29 IST
1 / 6नवरात्रीच्या (Navratri 2025) उपवासांच्या दिवसांत अनेकदा साबुदाण्यांचे पदार्थ खाल्ले जातात. पण साबुदाण खिचडी, वडे काहीही करण्यासाठी सगळ्यात आधी साबुदाणे व्यवस्थित भिजवावे लागतात. साबुदाणे नीट भिजले नाही तर पदार्थ बिघडतो.(Ultimate Guide to Instantly Soaking Sabudana) 2 / 6साबुदाणा भिजवायला जर तुम्ही विसरलात तर टेंशन न घेता काही सोप्या युक्त्या वापरून साबुदाणा छान भिजवू शकता. जेणेकरून तुम्हाला लगेच पदार्थ करता येतील.(Quick Fixes for Unsoaked Sabudana)3 / 6साबुदाणा स्वच्छ धुऊन एका भांड्यात घ्या. त्यात साबुदाणा पूर्णपणे बुडेल एवढं गरम पाणी घाला. भांड्यावर झाकण ठेवून १०-१५ मिनिटं ठेवा. साबुदाणा मऊ आणि फुललेला दिसेल. यानंतर तुम्ही नेहमीप्रमाणे त्याची खिचडी किंवा वडे बनवू शकता. 4 / 6ही आणखी एक सोपी आणि प्रभावी पद्धत आहे. यासाठी साबुदाणा एका कढईत मंद आचेवर थोडा गरम करून घ्या. साबुदाण्याचा रंग बदलू नये. तो फक्त गरम झाला पाहिजे. त्यानंतर तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.5 / 6थालीपीठ, धिरडे किंवा डोसा बनवण्यासाठी करू शकता. साबुदाणा भाजल्यामुळे तो लवकर शिजतो आणि पचायलाही हलका असतो.6 / 6जर तुम्हाला झटपट खिचडी करायची असेल तर साबुदाणा धुऊन लगेच एका पातेल्यात घ्या. त्यात थोडं पाणी घालून तो गॅसवर ठेवा. साबुदाणा शिजल्यानंतर त्यात भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि मीठ घालून खिचडी तयार करा.