कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
Updated:September 19, 2025 14:00 IST2025-09-19T13:48:39+5:302025-09-19T14:00:29+5:30
व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि पाचक एंजाइम्सने समृद्ध असलेलं सुपरफूड तुम्हाला माहीत आहे का?

आजकाल प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी हेल्दी डाएटवर लक्ष केंद्रित करतं आहे, त्यांच्या आहारात ते काजू, फळं, हिरव्या भाज्या आणि ग्रीन टीचा समावेश हमखास करतात.
व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स आणि पाचक एंजाइम्सने समृद्ध असलेलं सुपरफूड तुम्हाला माहीत आहे का? जे खाल्ल्याने त्वचेवर चमक येते आणि वजन कमी होतं. आहारात या फळाचा समावेश केल्याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात.
लोक निरोगी राहण्यासाठी विविध सुपरफूड शोधतात, परंतु आपण ज्या फळाबद्दल बोलत आहोत ते केवळ निरोगीच नाही तर स्वस्त आणि बाजारात सहज उपलब्ध होणार आहे. ते फळ म्हणजे पपई.
पपई ही जादुई फळापेक्षा कमी नाही, कारण ती खाल्ल्याने शरीराला असंख्य फायदे होतात. गोड आणि चविष्ट असण्यासोबतच पपई असंख्य पोषक तत्वांनी भरलेली असते.
वजन कमी करण्यास उपयुक्त
कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असलेली पपई खाल्ल्याने आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं, ज्यामुळे ओव्हरईटींग रोखलं जाते. म्हणून वजन कमी करताना तुमच्या आहारात पपईचा समावेश करणं फायदेशीर आहे.
हृदय आणि ब्लड शुगरसाठी फायदेशीर
पपईतील पोटॅशियम ब्लड प्रेशर नियंत्रित करतं आणि हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पपईमध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठी ते फायदेशीर ठरतं. ते त्यांच्या आहारात देखील त्याचा समावेश करू शकतात.
पचन
पपईमध्ये आढळणारे पपीन एंजाइम अन्न लवकर आणि योग्यरित्या पचवण्यास मदत करतात. फायबरमुळे पोटासाठी फायदेशीर आहे आणि ते रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते.
त्वचेला नॅचरल ग्लो
पपईमध्ये व्हिटॅमिन सी, लायकोपीन आणि बीटा-कॅरोटीन हे सर्व असतं, ज्यामुळे ती त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. त्यातील अँटीऑक्सिडंट त्वचा ग्लो करते. तसेच चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात.
नाश्त्यामध्ये ताजे पपईचे काही तुकडे खा. पपई स्मूदी, सॅलड खाऊ शकता. पपई खाण्याचे शरीराला अनेक फायदे होत असल्याने लोक आता आपल्या आहारात त्याचा समावेश करत आहेत.