Join us
Daily Top 2 Weekly Top 5

गुरगुट्या भात तूप मेतकूट म्हणजे खाण्याचं सुखच सुख! पाहा खमंग मेतकुटाची अस्सल पारंपरिक रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2026 09:35 IST

1 / 6
मेतकूट हा महाराष्ट्राचा एक पारंपरिक पदार्थ. लग्नकार्य असलं की आवर्जून मेतकूट केलंच जातं. खमंग मेतकूट गरम भातासोबत तसेच पोळीसोबतही खायला खूप छान लागतं. त्याच मेतकुटाची ही एक पारंपरिक रेसिपी पाहा...
2 / 6
मेतकूट करण्यासाठी चणा डाळ, उडदाची डाळ, मूग डाळ अशा सर्व डाळी एकेक वाटी या प्रमाणात घ्या. सगळ्यात आधी चणा डाळ छान खमंग भाजून घ्या. त्यानंतर ती कढईतून बाहेर काढा.
3 / 6
यानंतर उडीद डाळ, मूग डाळ हे देखील एकेक करून भाजून घ्या.
4 / 6
त्यानंतर ३ ते ४ चमचे गहू घ्या आणि ते देखील व्यवस्थित खमंग भाजून घ्या. पदार्थ भाजून घेताना गॅस नेहमी मंद आचेवर ठेवावा.
5 / 6
त्यानंतर अर्धी वाटी तांदूळ भाजून घ्या. त्यानंतर मेथी दाणे, धणे, जिरे खमंग भाजून घ्या.
6 / 6
भाजून घेतलेले सगळे पदार्थ, चवीनुसार मीठ आणि तिखट तसेच थोडीशी हळद घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. छान चवदार खमंग मेतकूट तयार.
टॅग्स : अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.