1 / 9३१ डिसेंबरच्या रात्री सगळेच मित्रमैत्रिणी परिवार एकत्र येऊन नव्या वर्षाचे आनंदाने स्वागत करतात. खाण्याची तर मेजवानीच असते. पार्टीसाठी काय करावे असा प्रश्न पडला असेल तर पाहा काही पदार्थ. जे करताही येतात पटकन आणि सगळ्यांना आवडतील याची खात्री. 2 / 9सध्या फार लोकप्रिय असलेला पदार्थ म्हणजे मोमोज. करायला वाटते तेवढे कठीण नसतात. तसेच सोबत टोमॅटोची चटणी करा. हा पदार्थ नक्कीच हिट ठरेल.3 / 9काही भारतीय पदार्थ करायचे असतील तर मग मिनी बटाटा वडा, कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी, आदी पदार्थ आहेतच. समोसा पार्टी तर भारतात घरोघरी केली जाते. 4 / 9तुम्ही हेल्थचा फार विचार करत असाल आणि पार्टीमध्ये केलेले खायला आवडत नसेल तर मस्त चीज ड्रेसिंगचे सॅलेड करु शकता. हा पदार्थ पौष्टिकही असतो आणि पार्टीमध्ये एकदम फॅन्सी दिसेल. 5 / 9लहान मुलांसाठी काही करायचे असेल तर सगळ्या मस्त पर्याय म्हणजे फ्रेंच फ्राईज. फक्त बटाटा आणि तेल असेल की काम झाले. मुले पोटभर खातात आणि खुषही होतात. 6 / 9गोडाधोडाचे पदार्थ करायचे म्हणजे त्यात चॉकलेट्स आलेच. तसेच केक आवर्जून घरोघरी केला जातो. तसेच डोनट्स करता येतात. अगदी सोपा असा पदार्थ आहे. लहान मुलांना तर हा बेत नक्कीच आवडेल. 7 / 9कॉर्न चाट हा पदार्थ वाढदिवस ते नवीन वर्ष सगळ्याच पार्टीत लोकप्रिय ठरतो. करायला अगदीच सोपा पदार्थ आहेत. फक्त आवडत्या भाज्या उकडलेल्या मक्यासोबत मिक्स करा. तसेच त्यात आवडते सॉस आणि चीज घाला. भरपूर बटर घाला आणि गरमागरम खा. 8 / 9मिल्कशेक्स करणे सोपेही आणि सगळ्यांना आवडतेही. फळांचा वापर करा, कोको पावडर वापरा. दुधात सुकामेवा घाला. तुम्हाला ज्या पद्धतीचे आवडते तसे तयार करा. पोटभरीचेही होते आणि गार प्यायची इच्छाही पूर्ण होते. 9 / 9घरीच साधा पिझ्झा किंवा होमस्टाइल बर्गरही करता येतो. अशा अनेक रेसिपी आहेत ज्या काही मिनिटांत होतात. त्यासाठी जास्त वेळ वाट पाहायची गरज नाही. लहान मुलांना आणि मोठ्यांनाही हे पदार्थ आवडतात.