घरीच करा हे ७ प्रकारचे कुरकुरीत वेफर्स, अगदी सोपी रेसिपी, खा चांगल्या तेलात तळलेले वेफर्स

Updated:October 4, 2025 08:55 IST2025-10-04T08:50:23+5:302025-10-04T08:55:01+5:30

Make these 7 types of crispy wafers at home, very easy recipes, from spicy snacks to fried in good oil : वेफर्स आवडतात? मग घरीच करा या प्रकारे.

घरीच करा हे ७ प्रकारचे कुरकुरीत वेफर्स, अगदी सोपी रेसिपी, खा चांगल्या तेलात तळलेले वेफर्स

स्नॅक्सचे अनेक प्रकार आपण आवडीने खातो. त्यातील काही प्रकार घरीही करता येतात. त्यापैकी फार लोकप्रिय असा प्रकार म्हणजे वेफर्स. घरोघरी याचे पाकीट्स भरलेले असतात. तसेच घरी वेफर्स करणेही फार सोपे असते.

घरीच करा हे ७ प्रकारचे कुरकुरीत वेफर्स, अगदी सोपी रेसिपी, खा चांगल्या तेलात तळलेले वेफर्स

विविध प्रकारचे वेफर्स बाजारात मिळतात. चवीला भारी असतात. मात्र विकतचे वेफर्स तळण्यासाठी वापरले गेलेले तेल चांगले नसते. त्यामुळे आरोग्याची हानी होते. घरी करता येणारे वेफर्सचे प्रकार पाहा कोणते आहेत.

घरीच करा हे ७ प्रकारचे कुरकुरीत वेफर्स, अगदी सोपी रेसिपी, खा चांगल्या तेलात तळलेले वेफर्स

केळा वेफर्स हा फार प्रसिद्ध असा प्रकार आहे. दक्षिण भारतातून आलेला हा पदार्थ भारतभर आवडीने खाल्ला जातो. घरी केळा वेफर्स करणे फार सोपे आहे. तळण्यासाठी तेल खोबरेल वापरायचे म्हणजे विकतपेक्षा भारी घरीच तयार करता येतात.

घरीच करा हे ७ प्रकारचे कुरकुरीत वेफर्स, अगदी सोपी रेसिपी, खा चांगल्या तेलात तळलेले वेफर्स

बटाटा वेफर्स करायला अगदीच सोपे आहेत. फक्त बटाटा पातळ चिरु घेतल्यावर कोरड्या फडक्यावर पसरवायचे आणि वाळवायचे. म्हणजे ते कुरकुरीत होतात.

घरीच करा हे ७ प्रकारचे कुरकुरीत वेफर्स, अगदी सोपी रेसिपी, खा चांगल्या तेलात तळलेले वेफर्स

तिखट केळा वेफर्स करणेही सोपेच. त्यासाठी मात्र गोलाकार चकत्या न तयार करता लांबट करायच्या. तळून झाल्यावर त्याला मीठ, तिखट आणि चाट मसाला लावायचा.

घरीच करा हे ७ प्रकारचे कुरकुरीत वेफर्स, अगदी सोपी रेसिपी, खा चांगल्या तेलात तळलेले वेफर्स

बटाटा वेफर्समध्ये अनेक प्रकार असतात. त्यापैकी एक मस्त प्रकार म्हणजे चीज लावलेले वेफर्स. जसे बटाटा वेफर्स तयार करता तसेच करायचे आणि नंतर चीज पावडरमध्ये घोळवायचे.

घरीच करा हे ७ प्रकारचे कुरकुरीत वेफर्स, अगदी सोपी रेसिपी, खा चांगल्या तेलात तळलेले वेफर्स

घरी पालक बटाटा चीप्स करता येतात. त्यासाठी पालक शिजवायचा आणि त्याची पेस्ट तयार करायची. बटाटा किसून घ्यायचा. जरा शिजवायचा आणि पालक बटाट्याचे मिश्रण करायचे. पीठ मळायचे आणि मग त्याचे पातळ काप करायचे. तळायचे आणि साठवून ठेवायचे.