1 / 10भेंडी ही अशी एक भाजी आहे जी खाण्यासाठी लहान मुलंही फार नखरे करत नाहीत. घरी सारख्या-सारख्या तयार केल्या जाणाऱ्या भाज्यांपैकी एक म्हणजे भेंडी. 2 / 10भेंडीची साधी भाजी आपण तयार करतोच. पण भेंडीची भाजी तयार करण्याच्या विविध पद्धती आहेत. सर्वच प्रकारच्या रेसिपींची चव वेगळी लागते. 3 / 10या ७ भेंडीच्या रेसिपी पाहा. यापैकी तुम्ही कोणती रेसिपी कधी तयार केली नसेल तर ती तयार करा. नक्कीच आवडेल. तुम्हालाही आणि घरातील चिल्यापिल्यांनाही.4 / 10दह्यातली भेंडी हा एक फारच चविष्ट प्रकार आहे. तयार करायलाही सोपा आहे. 5 / 10करारी भेंडी किंवा कुरकुरीत भेंडी हा पदार्थ लग्न समारंभांमध्ये असतो. तो घरी तयार करणेही फारच सोपे आहे.6 / 10 कोकणासारख्या ठिकाणी भेंडीची रस भाजी तयार केली जाते. भरपूर नारळ या भाजीसाठी वापरला जातो.7 / 10भेंडीची भाजी तर खाल्ली असेलच पण भेंडीची भजी कधी खाल्लीत का? फारच चविष्ट होते. बेसनाबरोबर तांदळाचे पीठही वापरा एकदम कुरकुरीत होते. 8 / 10भरलेली भेंडी हा पदार्थ फार लोकांना माहिती नसतो. पण चवीला फारच रूचकर असा पदार्थ आहे. साधी भाजी न करता कधी तरी या पद्धतीची भाजी तयार करून बघा. 9 / 10ताकातली भेंडी हा पदार्थ मध्यंतरी इंस्टाग्रामवर फार व्हायरल झाला होता. हा पदार्थ तयार करणे अगदीच सोपे आहे.10 / 10भेंडी तयार करताना शक्यतो दाण्यांचे कुट वापरले जाते. मात्र चिंचाच्या कोळातील भेंडी असा ही एक आंबट गोड प्रकार तयार केला जातो.