भाऊबिजेला करा खास ८ पदार्थ, सगळेच आवडीने खातील, दादाला भरवा गोड घास
Updated:October 22, 2025 18:14 IST2025-10-22T18:05:55+5:302025-10-22T18:14:49+5:30
Make 8 special dishes for Bhaubij, everyone will love it, sweet food for brother : भाऊबिजेसाठी करा खास गोडाचे पदार्थ.

भाऊबीज हा प्रेम आणि आपुलकीचा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावासाठी गोड पदार्थ तर करतातच. हे ८ स्वादिष्ट आणि पारंपरिक गोड पदार्थ नक्की करुन पाहा.
श्रीखंड
दह्यापासून केलेले श्रीखंड केशर, साखर आणि वेलचीमुळे अतिशय सुगंधी आणि गोड लागते. महाराष्ट्रातील पारंपरिक खास पदार्थ आहे.
बंगाली पद्धतीचा हा गोड पदार्थ करायला तसा सोपा आहे. साखरेच्या पाकात व्यवस्थित बुडवायचा हलका आणि रसाळ होतो.
बेसन लाडू
बेसन, साखर आणि तूप यांचं सुंदर मिश्रण म्हणजे हा लाडू. भाऊबिजेसाठी करा आणि हा पदार्थ दीर्घकाळ टिकतो.
खोबऱ्याची बर्फी
ताजं खोबरं, साखर आणि थोडीशी वेलची घालून केलेली ही बर्फी घरातल्या सगळ्यांना आवडते.
मोदक
गणपतीसाठी प्रसिद्ध असलेला पण सणासुदीला केला जाणारा गोड मोदक हा नारळ-गूळाचे सारण भरलेला पदार्थ आहे.
गुलाबजाम
खव्याचा गुलाबजाम करायला सोपा आहे. तसेच हा पदार्थ फार लोकप्रिय असतो.
रवा शिरा
तुपावर परतलेला रवा, साखर आणि सुका मेवा यांचं सुंदर मिश्रण, सकाळच्या आरतीसाठी योग्य गोड पदार्थ आहे.
पेढे
दुधाचे पेढे करायला सोपे असतात. तसेच घरी केल्यामुळे ताजे आणि जास्त चविष्ट लागतात.