वाटीभर बेसनाचे करा ७ पदार्थ, झटपट पौष्टिक पदार्थांची ही घ्या चमचमीत यादी
Updated:November 21, 2025 13:37 IST2025-11-21T13:33:21+5:302025-11-21T13:37:41+5:30
Make 7 dishes with a bowl of gram flour, get this amazing list of quick and nutritious dishes : बेसनाचे करा चविष्ट पदार्थ. पाहा किती मस्त रेसिपी आहेत.

बेसन सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. घरी बेसनाचे विविध पदार्थ करता येतात. तसेच अगदी झटपट होतात. बेसनाची चवही फार छान असते. त्यामुळे घरोघरी बेसन वापरले जातेच.
बेसनाचा मऊ आणि जाळीदार असा ढोकळा करता येतो. हलका , फुलका आणि आवडीने खाल्ला जाणारा हा पदार्थ नाश्त्यासाठी मस्त आहे.
महाराष्ट्रात घरोघरी केला जाणारा चविष्ट पदार्थ म्हणजे कढी. अगदी पाच मिनिटांत होते. भात आणि कढी म्हणजे सुख आहे. पोटाला आराम मिळतो.
बेसन चीला किंवा बेसनाचा पोळा हा पदार्थ लहान ते मोठे सगळेच फार आवडीने खातात. त्यात भाज्या घालू शकता. तसेच फक्त मिरची - लसूण घालून केले तरी मस्त होते.
राजस्थानी स्टाइल बेसनाची मसालेदार भाजी करता येते. त्याला गट्टे की सब्जी असे म्हणतात. ही रेसिपी फार चमचमीत आणि मसालेदार असते.
वडापाव तर सगळे खातातच त्यासोबत चुरापावही लोकप्रिय आहे. हा चुरा तयार करण्यासाठी फक्त बेसन पुरेसे असते. पाच मिनिटांत करता येतो.
बेसनाची शेव झटपट होते. विकतपेक्षा पौष्टिक आणि चविष्ट शेव घरी करता येते. त्यासाठी शेवपात्र वापरा आणि मस्त गरम तेलात तळून घ्या.
बुंदी आवडते का ? बुंदी करणे अगदीच सोपे. झाऱ्याचा वापर करुनही बुंदी तयार करता येते. तिखट - मीठ घालून करायची. दही घालून दहीबुंदी करता येते.