1 / 8पालकाची भाजी फार पौष्टिक असते. पालकात लोह असते तसेच अनेक जीवनसत्वे असतात. कॅल्शियम असते. पालकाची भाजी त्वचा, हाडे, पचन सगळ्यासाठीच चांगली असते. 2 / 8पालकाचे विविध पदार्थ करता येतात. पालक लवकर शिजतो तसेच पालकाचे पदार्थ करायलाही अगदी सोपे असतात. आहारात पौष्टिक आणि चविष्ट दोन्ही गुण असणारे पदार्थ असावेत. त्यासाठी पालक एकदम मस्त भाजी आहे. 3 / 8पालकाची भाजी तर सगळेच करतात. पालक पनीर फार पौष्टिक आणि चविष्ट असा पदार्थ आहे. पालकाची पातळ भाजी केली जाते. तसेच डाळ घालून पालकाची केलेली भाजी मस्त लागते. 4 / 8पालकाचे वरण आणि त्यावर लसणाची फोडणी म्हणजे आहाहा!! एकदम मस्त लागते. गरमागरम भातावर तूप आणि पालकाचे वरण घ्यायचे. पावसाळ्यात नक्की करुन पाहा. 5 / 8पालकाची भाजी केली जाते आणि भजीही. पालकाची भजी करायला तर एकदम सोपी आहे. छान कुरकुरीत होते. अख्खे पानही तळता येते, तसेच पालक चिरुन त्याची बोंडा भजीही करता येते. 6 / 8नाश्त्यासाठी पालक पराठा करु शकता. झटपट होते आणि पोटभरीचा पदार्थ आहे. लहान मुलांच्या डब्यासाठी अगदी पौष्टिक आहे. मुलांना पालेभाज्या खाऊ घालण्यासाठी पराठा हा एकदम मस्त पर्याय आहे. 7 / 8लसूणी पालक कधी खाल्ला का? फक्त भरपूर लसूण, पालक आणि लाल तिखट या पदार्थांच्या मिश्रणातून तयार होणारा हा कमालीचा पदार्थ भाकरी, भात, पोळी सगळ्यासोबत मस्तच लागतो. 8 / 8पालकाचे कुरकुरीत चिप्सही करता येतात. त्यासाठी मैदा, तांदळाचे पीठ वापरता येते. पालकाचा रस काढून पीठात घालायचा आणि पीठ मळून त्याचे तुकडे करुन तळून घ्यायचे. चहासोबत खाण्यासाठी एकदम मस्त पदार्थ आहे.