महाशिवरात्रीच्या उपवासाला करा कुरकुरीत उपवासाचा डोसा; सोपी रेसिपी
Updated:February 11, 2026 23:25 IST2026-02-11T23:05:27+5:302026-02-11T23:25:57+5:30
Mahashivratri 2026 Vrat Fasting Food Recipes: महाशिवरात्री विशेष उपवासाचा डोसा महाशिवरात्रीच्या उपवासासाठी नेहमीचे तेच ते पदार्थ खाण्यापेक्षा उपवासाचा डोसा हा एक वेगळा पदार्थ खाऊन पाहा. (Upvas Dosa Recipe in Marathi) :

How To Make Sabudana Dosa
महाशिवरात्रीच्या (Mahashivratri 2026) उपवासाला नेहमी खिचडी किंवा वरीचे तांदूळ खाण्यापेक्षा तुम्ही उपवासाला खायला चालतील असे पदार्थ ट्राय करू शकता. उपवासाचा डोसा करण्याची सोपी, झटपट रेसिपी पाहूया. (Mahashivratri Special Vrat Ka Dosa)
1 वाटी वरीचे तांदूळ, दीड वाटी साबुदाणा, अर्धी वाटी दही, चवीनुसार मीठ आणि हिरव्या मिरच्या हे साहित्य लागेल. (Fasting Dosa Sabudana Dosa)
सर्व प्रथम वरीचे तांदूळ आणि साबुदाणा स्वच्छ धुवून २ ते ३ तास पाण्यात भिजत ठेवा.
भिजवलेले तांदूळ-साबुदाणा गाळून मिक्सरमध्ये घ्या. त्यात दही आणि मिरच्या घालून बारीक पेस्ट तयार करा.
तयार मिश्रण एका भांड्यात काढून घ्या आणि गरजेनुसार पाणी घालून डोश्यााच्या पिठाप्रमाणे पातळ पीठ तयार करा.
पिठात चवीनुसार मीठ घाला आणि १० ते १५ मिनिटं झाकून ठेवा. जेणेकरून डोसे मऊ आणि जाळीदार होतील.
गॅसवर नॉन स्टिक तवा गरम करायला ठेवा आणि तव्याला थोडं तूप किंवा तेल लावून घ्या.
तव्यावर एक पळी पीठ मध्यभागी घालून गोल आकारात पातळ पसरवून घ्या.
डोश्याच्या कडेनं थोडं तूप सोडा आणि दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवर कुरकुरीत भाजून घ्या.