Join us

Maharashtra recipes : लालचुटूक टोमॅटोचे हे ७ पदार्थ एकदा खा, तुम्ही म्हणाल टोमॅटो आहे की चवीचा खजिना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2025 15:02 IST

1 / 9
अनेक फळभाज्या आपल्या रोजच्या आहारात असतात. त्यापैकीच एक म्हणजे टोमॅटो. मात्र टोमॅटोचे पदार्थ असा काही प्रकार आपण फार करत नाही. एखाद्या पदार्थात साईड फूड एवढीच भूमिका या टोमॅटोची असते. मात्र टोमॅटोला स्वत:ची वेगळी चव असते.
2 / 9
टोमॅटोशिवाय करता येऊ शकत नाहीत असेही काही पदार्थ असतात. हे पदार्थ टोमॅटोचेच केले जातात. फक्त चव वाढवण्यासाठी टोमॅटो न वापरता त्याचे स्वतंत्र पदार्थही नक्की करुन पाहा. मस्त लागतात आणि करायला एकदम सोपे असतात.
3 / 9
जसं की महाराष्ट्रात घरोघरी केलं जाणारं टोमॅटो सार. अगदी कमी सामग्रीत भरपूर टोमॅटो घालून केलेले हे सार फक्त चवीला भन्नाट नसते, तर पावसाळा आणि हिवाळ्यात हे सार घशासाठी फार उपयुक्तही ठरते. मसाले भातासोबत हे सार मिळाले तर मग आणखी काहीच नको.
4 / 9
हॉटेलमध्ये आजकाल अनेक प्रकारचे सूप मिळतात. मात्र एकेकाळी हॉटेल मेन्यूमध्ये टोमॅटो सुपचेच राज्य होते. सगळे जेवणाची सुरवात या सुपनेच करायचे. टोमॅटो घरी करणेही एकदम सोपे आहे. टोमॅटो सार आणि टोमॅटो सूप दोन्ही एकदम वेगळे पदार्थ आहेत. दोन्ही एकदम चविष्ट.
5 / 9
झटपट नाश्ता करायचा आहे तर मग टोमॅटो आमलेट करा. भरपूर टोमॅटो, हिरवी मिरची तसेच आवडत असेल तर एखादा कांदा आणि बेसन या मिश्रणात मसाले आणि मीठ घालून मस्त खमंग टोमॅटो आमलेट करता येते. पाच मिनिटांत गरमागरम खाता येते.
6 / 9
इडली, मेदू वडा खास अण्णाकडे जाऊन खायचा असेल तर फक्त नारळाची चटणी नसते तर साऊथ स्पेशल टोमॅटोची झणझणीत चटणीसुद्धा सोबत मिळते. टोमॅटो आणि काश्मीरी लाल मिरचीची ही चटणी आपण घरीही करु शकतो. त्यात दाणे परतून घालायचे आणि झणझणीत तडका द्यायचा.
7 / 9
अनेक प्रकारचे पराठे आपण खातो. कधी टोमॅटो पराठा खाल्ला आहे का? नसेल खाल्ला तर नक्की खाऊन बघा. विविध मसाल्यांसोबत टोमॅटो मस्त परतून घ्यायचा आणि तो मसाला गव्हाच्या पीठात भरुन खमंग पराठा करायचा. अगदीच मस्त लागतो.
8 / 9
आमटी, वरण आपण नेहमी खातोच मात्र कधीतरी मस्त खमंग रस्समभातही खातो. या रस्समची खरी मज्जा टोमॅटोमध्येच तर असते. भरपूर टोमॅटो घालून केलेले रस्सम आरोग्यासाठी फार चांगले असते. करायला अगदीच सोपे आहे.
9 / 9
टोमॅटोबद्दल विषय सुरु असेल तर झणझणीत टोमॅटो भात विसरुन चालणार नाही. जेवणासाठी करा, नाश्त्यासाठी करा. हा पदार्थ चवीला एकदम मस्त आहे. एकदा खाल्ला की चटक लागते. भरपूर लसूण आणि टोमॅटो घालून हा भात करायचा. म्हणजे चव आणखी भारी लागते.
टॅग्स : टोमॅटोअन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती