1 / 8हल्ली किटी पार्टी, भिशी पार्टी यांचे प्रमाण खूप वाढले आहे. यानिमित्ताने काही मैत्रिणी एकत्र येतात, भेटीगाठी होतात आणि गप्पाटप्पा मारल्या जातात.. 2 / 8या पार्ट्यांचा मुख्य उद्देश म्हणजे एकमेकींची भेट होणे हा असतो. पण नेमकं जिच्या घरी पार्टी असते ती मैत्रिणींसाठी नाश्ता करण्यात आणि तो वाढण्यात एवढी गुंतून जाते की तिला या पार्टीचा खरा आनंद घेताच येत नाही. 3 / 8म्हणूनच हे काही पदार्थ पाहा.. स्नॅक्स म्हणून देण्यासाठी ते अतिशय उत्तम आहेत. शिवाय ते करायला आणि वाढायलाही खूप वेळ लागत नाही. या पदार्थांमुळे तुमचा जास्त वेळ किचनमध्ये जाणार नाही आणि मैत्रिणींसोबत गप्पा मारायला भरपूर वेळही मिळेल. 4 / 8इडली सांबार हा एक चांगला मेन्यू आहे. मैत्रिणी घरी येण्याच्या आधीच इडल्या आणि सांबार करून ठेवा. आयत्यावेळी सांबार गरम करून पटापट डिश भरा. सांबार गरम असल्यावर इडल्या थंड असतील तरीही चालते. 5 / 8मिसळ पाव हा असाच एक मस्त मेन्यू.. मिसळ आधीच करून ठेवा. फरसान, बारीक चिरलेला कांदा, लिंबू, दही यांच्या बाऊल भरून ठेवा. मैत्रिणी आल्यानंतर मिसळ गरम करून सर्व्ह करा. पाव भाजण्याची, गरम करत बसण्याची कटकटच नाही.6 / 8भिशी पार्टीसाठी तुम्ही चटपटीत भेळही करू शकता. ती करायला अतिशय सोपी तर असतेच शिवाय सगळ्यांना आवडतेही..7 / 8सॅण्डविच हा देखील एक चांगला मेन्यू असू शकतो. व्हेज सॅण्डविच गरम करण्याचीही गरज नसते. शिवाय सर्व्ह करायलाही अगदीच सोपे. 8 / 8पाणीपुरीचा विचारही तुम्ही करू शकता. गोड पाणी, तिखट पाणी आणि बटाट्याचं सारण प्रत्येकीला आपापलं देऊन टाकायचं. सगळ्या जणी आपापलं करून गप्पा मारत खाऊ शकतात.