International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट...

Updated:May 20, 2025 16:48 IST2025-05-20T16:23:59+5:302025-05-20T16:48:03+5:30

International Tea Day 2025: International Tea Day is celebrated every year on the 21st of May : चहा हे जगातील सर्वाधिक लोकप्रिय पेय असून, ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन’च्या निमित्ताने, ‘चहा’ला अर्पण केलेला खास दिवस...

International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट...

कल्पना करा पहिल्यांदा चहा कुणी केला असेल? चहात दूध साखर कुणी घातली असेल? कुणाला वाटलं असेल की कोऱ्या चहात लिंबू पिळून प्यावं मस्त लागेल? प्रश्न काहीही असो, ते म्हणतात ना चहाला वेळ नसते. वेळेला चहा लागतोच. कपभर चहा म्हणजे आपुलकी. संवादाची सुरुवात (International Tea Day).

International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट...

घरी आलेल्या पाहुण्याला अगत्यानं चहा द्यावा किंवा स्वत: टपरीवर जाऊन प्यावा. कुठं हाय टी तर कुठं आलं आणि गवतीचहा कुटून टपरीवर भजीसोबत येणारा चहा!

International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट...

चहापानाच्या परंपरा जगभर सर्वत्र आहेत. किमान गेली तीनशे वर्षे तरी चहाची प्रत्येक देशातली रीतभात वेगळी. गरमागरम वाफाळलेला चहा अनेक माणसांची सुखदु:ख जोडत राहिला.

International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट...

पुढे तर गरम चहा गारढोणही झाला. म्हणजे आईस टी बनून आला. जगभरात गरम चहा इतकाच आइस टी प्रसिद्ध झाला. पुढे त्यात लिंबू, पुदिना, मध, फळं आणि अजून बरेच काही घालून त्याचा स्वाद बदलत राहिला.

International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट...

लोक अत्यंत थंडीतही आइस टी पितात आणि आपल्याकडच्या प्रचंड उकाड्यातही अनेकांना चहा लागतोच. चहा म्हणजे जगण्याची मस्त एनर्जी देणारी मजा.

International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट...

किती चहा बदनामही झाला काळाच्या ओघात. हल्ली ज्याला पित्त त्रास, ज्याला वजन कमी करायचे त्या प्रत्येकाला कुणी ना कुणी सांगतेच की, तू चहा सोड! पण चहाचं व्यसन असं की ते सुटता सुटत नाही. अगदी कमी चहा पिणारेही दिवसाला किमान दोन कप तर चहा पितातच..

International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट...

आता तर पावसाळा येईल, पावसात भिजत टपरीवरचा चहा, कॉलेजातला रोमान्स, सोबत मित्रमैत्रिणी आहे भरपूर दिलखुलास हसणं आणि गप्पा हे सारं म्हणजे जन्मभराच्या आनंदाचा ठेवा असतो. चहा भजी, चहा-वडापाव, चहा मॅजी आणि मस्त एक कटिंग चहा.. आयुष्यातली सगळी नकारात्मकता घालवायला अत्यंत आवश्यक गोष्ट!

International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट...

चहा देतो काय? हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे. चहा देतो रोजच्या कंटाळवाण्या कामात उत्साह आणि तरतरी. चहा देतो ब्रेक आणि सांगतो की, लाग परत कामाला सगळं छान जमेल तुला!

International Tea Day 2025: या, चहा प्यायला! चहा-दोस्ती आणि दुनियादारी-एक कप चहाची दमदार गोष्ट...

सकाळचा चहा म्हणजे प्रत्येक दिवसाची आनंदी सुरुवात. आणि केव्हाही चहा म्हणजे सर्व प्रकारचे भेद पुसून माणसांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा. चहाची गोष्ट कधीच न संपणारी आहे..