आहारात हे '६' पदार्थ असतील तर पोटाचे त्रास विसराच.. पाहा कोणते पदार्थ आहेत

Updated:April 28, 2025 19:06 IST2025-04-28T19:01:05+5:302025-04-28T19:06:15+5:30

If you have these '6' foods in your diet, forget about stomach problems : पोटासाठी, पचनासाठी अत्यंत गरजेचे असे हे पदार्थ आहारात असायलाच हवेत.

आहारात हे '६' पदार्थ असतील तर पोटाचे त्रास विसराच.. पाहा कोणते पदार्थ आहेत

आहारामध्ये चांगले पचेल असेच अन्न असावे. मात्र जि‍भेचे चोचलेही पुरवावे लागतात. त्यासाठी आपण चमचमीत, झणझणीत पदार्थ खातोच. पचनावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे काही पदार्थ आहारामध्ये असायलाच हवेत.

आहारात हे '६' पदार्थ असतील तर पोटाचे त्रास विसराच.. पाहा कोणते पदार्थ आहेत

जसे की झणझणीत पदार्थावर तूप घेतात किंवा लिंबू पिळतात. त्याच्या मागचे कारण म्हणजे तुपामुळे व लिंबामुळे पदार्थ पचायला जड असला तरी पचवता येतो. असेच काही पदार्थ आहारात असावेत ज्यामुळे जड पदार्थ खाल्यावर अपचन किंवा इतर त्रास होणार नाहीत.

आहारात हे '६' पदार्थ असतील तर पोटाचे त्रास विसराच.. पाहा कोणते पदार्थ आहेत

बडीशेप खाल्याने पचन चांगले होते त्यामुळे जेवणानंतर आपण बडीशेप खातो. मात्र विड्याचे नुसते पान बडीशेपसोबत खाल्याने पोटाला आराम मिळतो. त्यामुळे काहीही न लावलेले नुसते विड्याचे पान जेवणानंतर खावे.

आहारात हे '६' पदार्थ असतील तर पोटाचे त्रास विसराच.. पाहा कोणते पदार्थ आहेत

फोडणीमध्ये आपण कडीपत्ता टाकतो. कडीपत्ता पचनासाठी चांगला असतो. त्यामुळे फोडणीमध्ये ही पाने टाकायची असतात. फक्त सुगंधासाठी कडीपत्ता वापरला जात नाही. त्याची इतरही कारणे आहेत.

आहारात हे '६' पदार्थ असतील तर पोटाचे त्रास विसराच.. पाहा कोणते पदार्थ आहेत

हिंग फोडणीमध्ये वापरले जाते तसेच जिरेही वापरले जाते. हे दोन्ही पदार्थ पचनसंस्थेचे काम सुरळीत व्हावे यासाठी मदत करतात. त्यामुळे एखादा पदार्थ करताना त्यामध्ये हिंग टाकायला विसरु नका.

आहारात हे '६' पदार्थ असतील तर पोटाचे त्रास विसराच.. पाहा कोणते पदार्थ आहेत

दोडक्याची भाजी फार लोकप्रिय नाही. ही भाजी खायला लोकांना आवडत नाही. मात्र दोडकं पचनासाठी फार उपयुक्त असते. त्यामुळे आहारामध्ये त्याचा समावेश असणे चांगले आहे.

आहारात हे '६' पदार्थ असतील तर पोटाचे त्रास विसराच.. पाहा कोणते पदार्थ आहेत

पोट दुखत असले की आई ओवा खायला देते. ओवा पचनासाठी तसेच गॅसेस कमी करण्यासाठी औषधी आहे. ब्लोटींगही कमी होते. गरम पाण्यातून ओवा खाणे फायद्याचे ठरते. पदार्थांमध्ये चिमूटभर ओवा टाकावा.

आहारात हे '६' पदार्थ असतील तर पोटाचे त्रास विसराच.. पाहा कोणते पदार्थ आहेत

घरामध्ये आमसूल असते. ते अगदी कमी वापरले जाते. आमसुल पचनासाठी चांगले असते. त्यामुळे आमटीमध्ये भाजीमध्ये आमसुलाचा एक लहानसा तुकडा टाकणेसुद्धा फायद्याचे असते.