Join us

नॉनस्टिक असो किंवा साधा तवा, डोसा तव्याला चिकटणारच नाही - ६ टिप्स - करा डोसा परफेक्ट गोल - कुरकुरीत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2025 15:14 IST

1 / 7
कुरकुरीत, खरपूस मस्त सोनेरी गोल्डन ब्राऊन असा परफेक्ट डोसा तयार करणं ही एक (how to stop dosa from sticking on pan) प्रकारची कलाच आहे. अनेकदा परफेक्ट बॅटर (dosa sticking to tawa solution) तयार करूनही, जेव्हा डोसा तव्यावर टाकतो, तेव्हा तो तव्याला चिकटतो आणि पूर्णपणे फाटतो. यामुळे आपली मेहनत वाया जाते आणि मूड खराब होतो. डोसा तयार करताना तो तव्याला चिकटतो अशी अनेक गृहिणींची कॉमन तक्रार असते. डोसा तयार करताना तो तव्याला चिकटू नये यासाठी काही सोपे आणि घरगुती उपाय पाहूयात.
2 / 7
डोसा तयार करण्यापूर्वी तवा व्यवस्थित गरम करून घ्यावा. गरम तव्यावर थोडे मीठ भुरभुरवून घालावे मग तव्यावरच बर्फचा खडा ठेवून या खड्याच्या मदतीने मीठ संपूर्ण तव्यावर व्यावस्थित पसरवून घ्यावे. ३० सेकंदांसाठी ही कृती करावी मग स्वच्छ कापडाने तवा पुसून घ्यावा. या उपायामुळे डोसा तव्याला चिकटत नाही.
3 / 7
डोसा तयार करण्यापूर्वी तवा गरम करा आणि अर्ध्या कापलेल्या कांद्याला थोडे तेल लावून तव्यावर चोळा. कांद्यातील नैसर्गिक रस आणि तेल तव्यावर एक संरक्षक थर तयार करतात, ज्यामुळे डोसा तव्याला चिकटत नाही.
4 / 7
कांद्याऐवजी तुम्ही बटाटा देखील वापरू शकता. एका बटाट्याचा अर्धा भाग कापून घ्या. तवा मध्यम गरम झाल्यावर, या बटाट्याच्या तुकड्याने तेलाचे २ ते ३ थेंब घेऊन तवा व्यवस्थित पुसून घ्या. बटाट्यातील नैसर्गिक स्टार्च आणि तेलामुळे तव्याचा पृष्ठभाग गुळगुळीत होतो आणि डोसा सहज निघतो.
5 / 7
पहिला डोसा थोडा छोटा करा आणि तो काढून तवा पुन्हा हलकासा तेलाने पुसा. यानंतर केलेले डोसे अगदी परफेक्ट आणि तव्याला न चिकटता अगदी सहज निघतील.
6 / 7
मीठ तव्याच्या पृष्ठभागावरील चिकटपणा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते. तवा मध्यम गरम करा. तव्यावर २ चमचे मीठ (शक्य असल्यास जाडे मीठ) टाका. या मिठाला मध्यम आचेवर २ ते ३ मिनिटे भाजून घ्या. मीठ बाजूला काढून घ्या आणि तवा कोरड्या कापडाने पुसून घ्या. आता त्यावर पाण्याचे थोडे थेंब शिंपडा. पाणी लगेच वाफ झाले, म्हणजे तवा डोसा करण्यासाठी तयार आहे.
7 / 7
डोसा दोन्ही बाजुंनी व्यवस्थित शिजण्यासाठी तो उलथताना, उलाथन्याच पात पाण्यात भिजवून थोडं ओलं करावं. आणि मग अशा उलाथन्याने डोसा उलथून घ्यावा. पाण्यामुळे डोसा उलाथन्याला किंवा तव्याला न चिकटता सहज निघतो.
टॅग्स : अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.होम रेमेडी