Join us

बेसनाचा पोळा तव्याला चिकटतो? पाहा १ चमचा मिठाचा सोपा उपाय-पोळ्याला पडेल छान जाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2025 18:13 IST

1 / 6
बेसनाचा पोळा हा नाश्त्यामध्ये खाल्ला जाणारा आवडीचा पदार्थ. यात मसाले, मीठ, कांदा घालून बॅटर तयार केलं जातं पण अनेकदा बेसनाचा पोळा तव्यावर टाकताच क्षणी चिकटून बसतो किंवा त्याचे तुकडे होतात. (Besan chilla sticking solution)
2 / 6
परफेक्ट क्रिस्पी, जाळीदार बेसनाचा पोळा करणं थोडं अवघडच. जर बॅटर व्यवस्थित तयार झालं असेल, पण पोळा वारंवार तव्याला चिकटत असेल तर या पद्धतीने बेसनाचा पोळा करुन बघाच . काही मिनिटांत तयार होईल, जाळीदार पोळा. (Salt trick for chilla)
3 / 6
बेसनाचा पोळा बनवताना बॅटरमध्ये बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, मिरची आणि मीठ घालून मिक्स करा. गॅसवर पॅन ठेवून तो व्यवस्थित गरम होऊ द्या.
4 / 6
पीठ पॅनला चिकटू नये म्हणून आपण मीठाचा वापर करु शकतो. मीठाला पॅनवर सगळीकडे व्यवस्थित पसरवून घ्या. मीठाचा रंग बदलला की, कापडाने पुसून घ्या.
5 / 6
आता तयार बेसन पोळ्याचे बॅटर व्यवस्थित पॅनवर पसरवून घ्या. ज्यामुळे पीठ पॅनला चिकटणार नाही.
6 / 6
डोसा किंवा धिरडे, बेसनाचा पोळा बनवताना ही सोपी ट्रिक वापरली तर तव्याला चिकटणार नाही आणि जाळीदार बनेल.
टॅग्स : अन्नपाककृतीकिचन टिप्स