मऊ-स्पॉजी इडल्या घरीच करा; हॉटेलमध्ये वापरली जाणारी 'ही' खास ट्रिक वापरा, परफेक्ट होतील इडल्या

Updated:September 16, 2025 09:35 IST2025-09-16T09:34:00+5:302025-09-16T09:35:01+5:30

How To Make Soft Idli With 5 Basic Tips : इडलीचं सॉफ्ट आणि स्पॉन्जी टेक्चर इडलीला सगळ्या पदार्थांपेक्षा वेगळं ठरवते.

मऊ-स्पॉजी इडल्या घरीच करा; हॉटेलमध्ये वापरली जाणारी 'ही' खास ट्रिक वापरा, परफेक्ट होतील इडल्या

जेव्हाही साऊथ इंडियन (South Indian) पदार्थांबाबत बोलले जाते तेव्हा सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे इडली. सकाळचा नाश्ता असो किंवा डिनर इडली ही परफेक्ट डीश आहे. इडली टेस्टी असण्याबरोबरच एक हेल्दी पर्यायसुद्धा आहे. सांबार आणि नारळाच्या चटणीसोबत इडली एकदम चवदार लागते. (How To Make Soft Idli)

मऊ-स्पॉजी इडल्या घरीच करा; हॉटेलमध्ये वापरली जाणारी 'ही' खास ट्रिक वापरा, परफेक्ट होतील इडल्या

इडलीचं सॉफ्ट आणि स्पॉन्जी टेक्चर इडलीला सगळ्या पदार्थांपेक्षा वेगळं ठरवते. काही इडल्या तोंडात टाकताच विरघळतात. ऑनलाईन रेसिपीज पाहून घरात इडली बनवल्यास इडलीचं परफेक्ट टेक्चर बनत नाही. काही सिक्रेट टिप्स वापरून तुम्ही सॉफ्ट इडल्या बनवू शकता. या ट्रिक्स तुम्हाला नेहमी उपयोगी ठरतील. (How To Make Spongy Idli At Home)

मऊ-स्पॉजी इडल्या घरीच करा; हॉटेलमध्ये वापरली जाणारी 'ही' खास ट्रिक वापरा, परफेक्ट होतील इडल्या

जर तुम्हाला एकदम सॉफ्ट इडली करायची असेल तर योग्य तांदूळाची निवड करणं गरजेचं आहे. इडलीसाठी बासमती तांदळाचा वापर कधीही करू नका. इडली सॉफ्ट होण्यासाठी रेशनचा तांदूळ किंवा जाडा तांदूळ घ्या. यामुळे इडलीची चव आणि टेक्स्चर दोन्ही चांगले होते.

मऊ-स्पॉजी इडल्या घरीच करा; हॉटेलमध्ये वापरली जाणारी 'ही' खास ट्रिक वापरा, परफेक्ट होतील इडल्या

इडलीचं पीठ तयार करण्यासाठी दोन पदार्थांची आवश्यकता असते ते म्हणजे उडीदाची डाळ आणि तांदूळ. हे मिश्रण भिजवण्यासाठी प्रमाण योग्य असायला हवं. यासाठी २ कप तांदूळात १ कप उडीदाची डाळ घ्या. फर्मेंटेशनसाठी फ्रेश डाळीचा वापर करा.

मऊ-स्पॉजी इडल्या घरीच करा; हॉटेलमध्ये वापरली जाणारी 'ही' खास ट्रिक वापरा, परफेक्ट होतील इडल्या

डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर ते वाटण्यासाठी वेट ग्राईंडरचा वापर करा. हे वाटण्यासाठी थंड पाण्याचा वापर करा. तांदूळ दळताना जास्त गरम नसेल याची काळजी घ्या. यासाठी बर्फ किंवा थंड पाण्याचा वापर करा.

मऊ-स्पॉजी इडल्या घरीच करा; हॉटेलमध्ये वापरली जाणारी 'ही' खास ट्रिक वापरा, परफेक्ट होतील इडल्या

एकदम मोकळी, सॉफ्ट इडली करण्यासाठी मेथी दाण्याचा वापर करा. पण जास्त प्रमाणात मेथीचे दाणे घालू नका. अन्यथा इडली कटवट लागते. मेथीचे दाणे जेव्हा तुम्ही डाळ-तांदूळ भिजवाल तेव्हा दुसऱ्या एका भांड्यात भिजवून ठेवा.

मऊ-स्पॉजी इडल्या घरीच करा; हॉटेलमध्ये वापरली जाणारी 'ही' खास ट्रिक वापरा, परफेक्ट होतील इडल्या

इडलीचं बॅटर ५ ते ६ मिनिटं व्यवस्थित फेटून घ्या. त्यातून पूर्ण हवा बाहेर जाईल असं पाहा. ज्यामुळे इडलीचं टेक्सचर एकदम परफेफ्ट बनेल. हे पीठ एका स्टिलच्या भांड्यात काढून घ्या जेणेकरून व्यवस्थित फुलेल. नंतर हे पीठ झाकण लावून व्यवस्थित कव्हर करा आणि रात्रभर आंबवण्यासाठी सोडून द्या. हे पीठ व्यवस्थित आंबण्यासाठी स्टिलच्या भांड्यात ठेवा.