गार झाल्यावरही टम्म फुगलेल्याच राहतील पुऱ्या! पाहा ५ टिप्स - मस्त पुऱ्या डब्यात द्या, सावकाश खा...
Updated:August 6, 2025 20:10 IST2025-08-06T20:00:20+5:302025-08-06T20:10:01+5:30
How To Make Soft & Fluffy Puri : how to make crispy and puffy puri : perfect puri making method : tricks for puffed puris : गोल, गरगरीत टम्म फुगलेल्या पुऱ्या करायच्या मग लक्षात ठेवा खास टिप्स...

श्रावण महिन्यात एकामागोमाग एक येणारे सण, आणि अशा (How To Make Soft & Fluffy Puri) प्रसंगी प्रत्येक घरात जेवणाचा शाही बेत हमखास असतो. गरमागरम, टम्म फुगलेल्या आणि कुरकुरीत पुऱ्या जेवणाचा स्वाद अधिक खुलवतात.
पण काही वेळा पुऱ्या फुगत नाहीत किंवा वातड होतात, त्यामुळे मनासारखा (how to make crispy and puffy puri) स्वयंपाक न जमल्याची खंत वाटते. यावर प्रसिद्ध शेफ रणवीर ब्रार (perfect puri making method) एक खास उपाय सांगतो, ज्यामुळे तुम्ही देखील परफेक्ट फुगलेल्या पुऱ्या सहज तयार करू शकता. टम्म फुगलेल्या पुऱ्यांसाठी काय आहे शेफ रणवीरचा खास फॉर्म्युला? याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात...
१. पिठात मोहन योग्य प्रमाणात घाला :-
पुऱ्या, पराठा किंवा भटुरे यापैकी काहीही करायचं असल्यास, पीठ मळताना त्यात मोहन योग्य प्रमाणात घाला. पिठात मोहन परफेक्ट असणं गरजेचं आहे. मोहन फार जास्त किंवा फार कमी नसावं. मोहन मिसळल्यानंतर थोडंसं पीठ घेऊन मुठी वळा आणि सोडून द्या. जर पीठ घट्ट दिसत असेल आणि बांधलेलं राहत असेल, तर समजा की मोहन योग्य प्रमाणांत घातलं गेलं आहे.
२. पीठ नेमकं कसं मळावं :-
शेफ रणवीर यांनी त्यांची खास ट्रिक शेअर करत सांगितलं की, पीठ मळताना तुम्हाला हातांनी १०० % जोर लावण्याची गरज नाही. फक्त ५० % जोर लावला तरी पीठ उत्तम प्रकारे मळता येतं. कारण पीठ मळून झाल्यानंतर ते नैसर्गिकरीत्या ओलावा शोषून घेतं आणि चांगलं फुलतं ज्यामुळे ते अगदी मऊसर होतं. यामुळे फार जोर लावून ते मळण्याची गरज नसते.
३. पीठामध्ये रवा मिसळा :-
पुऱ्यांसाठीचे पीठ मळताना त्यात थोडा रवा घाला. पीठ मळून झाल्यावर लगेचच त्याच्या पुऱ्या तयार करायला घेऊ नका. आधी हे पीठ किमान २० ते ३० मिनिटांसाठी झाकून ठेवा. यामुळे पीठ फुलून येईल आणि त्यापासून तयार केलेल्या पुऱ्या अधिक चवदार आणि मऊसर होतील.
४. पुऱ्या लाटण्याची योग्य पद्धत :-
पीठ मळून झाल्यानंतर टम्म फुलणाऱ्या पुऱ्यांसाठी सगळ्यांत आधी तयार पिठाचे लहान - लहान गोळे तयार करून घ्या. जर पिठाचे गोळे खूप मोठे झाले, तर पुरी जाडसर होईल आणि नीट फुलणार नाही. तसेच पुरी फारशी पातळ लाटू नये. पुरी थोडी जाडसरच लाटावी जेणेकरून तळताना ती सहज फुलेल. त्यामुळे पुऱ्या ना पातळ ना फार जाड अशा मध्यम जाडीच्या लाटाव्यात.
५. पुरी तळताना लक्षात ठेवा :-
पुरी तळण्यासाठी तेलाचं तापमान खूप महत्त्वाचं असतं. तेल इतकं गरम असायला हवं की ज्या क्षणी तुम्ही पुरी तेलात सोडाल त्या क्षणी ती लगेच वर येऊ लागली पाहिजे. जर तेल पुरेसं गरम नसेल, तर पुरी खरपूस होण्याऐवजी कडक आणि तेलकट होऊ शकते. पुरी तेलात सोडल्यानंतर हलक्या हाताने चमच्याने तिच्यावर थोडा दाब द्या, यामुळे पुरी पूर्णपणे फुलते. त्यामुळे तेल गरम असणं आणि पुरी तळतानाची ही लहानशी ट्रिक लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे.