सकाळी टिफिनमध्ये ठेवलेली चपाती दुपारी वातड होते? ७ टिप्स, मऊ राहतील डब्यातील चपात्या

Updated:December 18, 2025 09:24 IST2025-12-18T09:08:00+5:302025-12-18T09:24:19+5:30

How To Make Soft Chapati At Home : चपाती रूमालात गुंडाळून डब्यात ठेवल्यानंतर डब्याचे झाकण घट्ट लावा.

सकाळी टिफिनमध्ये ठेवलेली चपाती दुपारी वातड होते? ७ टिप्स, मऊ राहतील डब्यातील चपात्या

चपाती तव्यावरून काढल्यानंतर लगेच टिफिनमध्ये भरू नका. ती एका जाळीवर किंवा प्लेटमध्ये ठेवा. जेणेकरून त्यातील जास्त गरम वाफ निघून जाईल. गरम वाफेमुळे डब्याला पाणी सुटते आणि चपाती खालून ओली, वातड होते

सकाळी टिफिनमध्ये ठेवलेली चपाती दुपारी वातड होते? ७ टिप्स, मऊ राहतील डब्यातील चपात्या

चपाती कधीही थेट स्टिलच्या डब्यात ठेवू नका. ती नेहमी एका स्वच्छ सुती रूमालात किंवा मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवा. कापड जास्तीचा ओलावा शोषून घेते आणि चपातीचा मऊपणा टिकवून ठेवते.

सकाळी टिफिनमध्ये ठेवलेली चपाती दुपारी वातड होते? ७ टिप्स, मऊ राहतील डब्यातील चपात्या

शक्यतो एल्युमिनियम फॉईलऐवजी बटर पेपर किंवा सुती कापडाचा वापर करा. फॉईलमध्ये चपाती जास्त वेळ राहिल्यास ती घामामुळे ओलसर आणि नंतर चिवट होऊ शकते.

सकाळी टिफिनमध्ये ठेवलेली चपाती दुपारी वातड होते? ७ टिप्स, मऊ राहतील डब्यातील चपात्या

चपाती रूमालात गुंडाळून डब्यात ठेवल्यानंतर डब्याचे झाकण घट्ट लावा. जर डबा एअर टाईल असेल तर बाहेरील हवा आत जात नाही आणि चपाती कोरडी पडत नाही.

सकाळी टिफिनमध्ये ठेवलेली चपाती दुपारी वातड होते? ७ टिप्स, मऊ राहतील डब्यातील चपात्या

जर शक्य असेल तर डब्यात चपात्या ठेवताना सर्वात खाली एक कोरिव कागद किंवा जाड टिश्यू पेपर असेल तर त्यावर कापडात गुंडाळलेली चपाती ठेवा. यामुळे खालच्या बाजूची चपाती साचलेल्या पाण्यानं भिजत नाही.

सकाळी टिफिनमध्ये ठेवलेली चपाती दुपारी वातड होते? ७ टिप्स, मऊ राहतील डब्यातील चपात्या

टिफिनसाठी तुम्ही फुलका करण्याऐवजी घडीची चपाती केली तर ती जास्तवेळ मऊ राहते.

सकाळी टिफिनमध्ये ठेवलेली चपाती दुपारी वातड होते? ७ टिप्स, मऊ राहतील डब्यातील चपात्या

याशिवाय चपाती मऊ राहण्याासाठी तुम्ही तेल किंवा तूप लावूनही टिफिनमध्ये ठेवू शकता.