1 / 7गव्हाच्या पिठामध्ये ग्लुटेन जास्त प्रमाणात असते. त्यामुळे अनेक जण हल्ली गव्हाच्या पोळ्या किंवा चपाती खाणं टाळतात. कारण त्यामुळे वजन आणि रक्तातील साखर वाढण्याची भीती वाटते. 2 / 7पण तुम्ही जर पोळ्या करण्यासाठी गव्हाचं पीठ भिजवताना त्यात काही पदार्थ मिसळले तर मात्र नक्कीच त्यामुळे वजन आणि शुगर वाढण्याचा धोका कमी होऊ शकतो (how to make regular chapati more healthy and tasty?). शिवाय पोळ्यांची पौष्टिकता आणि चव या दोन्ही गोष्टी अधिक वाढू शकतात. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहुया..(add 5 ingredients in atta to make it more healthy)3 / 7गव्हाचं पीठ १ किलो असेल तर त्यात २ चमचे इसबगाेल घाला. यामुळे रक्तातील साखर एकदम वाढत नाही. शिवाय त्यातून चांगल्या प्रमाणात फायबरही मिळते.4 / 7दुसरं म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये थोडं जवसाचं पीठ घाला. जवसाच्या पिठामधले हेल्दी फॅट्स, ओमेगा ३ आणि इतर काही घटक इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतात.5 / 7गव्हाच्या पिठामध्ये थोडी मेथी पावडरही घाला. कारण मेथी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. अशा पोळ्या मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी जास्त फायदेशीर ठरतात. 6 / 7कणकेमध्ये तुम्ही बेसनही मिसळू शकता. बेसनामुळे चांगल्या प्रमाणात प्रोटीन्स मिळते. त्यामुळे ७५ टक्के गव्हाचं पीठ आणि २५ टक्के बेसन असं कॉम्बिनेशन ठेवा. 7 / 7ओट्सही खूप पौष्टिक असतात. त्यामुळे गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही ओट्सही मिसळू शकता. त्यातून प्रोटीन्स, फायबर आणि इतर खनिजे चांगल्या प्रमाणात मिळतात. गव्हाचं पीठ ७० टक्के आणि ३० टक्के ओट्स असं कॉम्बिनेशन ठेवा.