परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

Updated:February 6, 2026 18:57 IST2026-02-06T15:38:22+5:302026-02-06T18:57:34+5:30

perfect south indian style uttappa : uttappa making tips and tricks : how to make perfect uttappa : उडप्याकडे मिळतो तसा उत्तपा घरच्याघरीच तयार करण्याची सोपी रेसिपी...

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

साऊथ इंडियन पदार्थांची क्रेझ संपूर्ण जगभर आहे, यातही 'उत्तपा' सगळ्यांच्याच (how to make perfect uttappa ) विशेष आवडीचा पदार्थ...उत्तपा म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो उडप्याच्या हॉटेलमधला जाड, मऊ आणि वरून कुरकुरीत असा परफेक्ट उत्तपा. बाहेर 'उडपी' हॉटेलमध्ये मिळतो तसा जाळीदार, मऊ आणि चविष्ट उत्तपा घरी का जमत नाही? अशी अनेकींची तक्रार असते.

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

घरीच उत्तपा करताना तो कधी तव्याला चिकटतो, तर कधी कडक (uttappa making tips and tricks) होतो इतकंच नाही तर कधी फारच पातळ होतो, कधी आतून कच्चा राहतो तर कधी हॉटेलसारखी चवच येत नाही. योग्य बॅटर, तव्याचं तापमान आणि काही खास ट्रिक्स माहित नसतील तर घरी उत्तपा परफेक्ट होत नाही.

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

घरच्याघरीच 'परफेक्ट उडपी हॉटेल स्टाईल उत्तपा करण्यासाठी काही (perfect south indian style uttappa) ट्रिक्स फायदेशीर ठरतात. ज्यामुळे उत्तपा अगदी बाहेर मिळतो तसाच लुसलुशीत आणि चविष्ट होईल.

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

उत्तपासाठी तांदूळ आणि उडद डाळीचे प्रमाण नेहमी ३:१ (३ वाट्या तांदूळ आणि १ वाटी उडद डाळ) ठेवावे. यामुळे पीठ छान फुलते आणि उत्तपा सॉफ्ट होतो.

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

उत्तपाची चव आणि मऊपणा बॅटरच्या फर्मेंटेशनवर अवलंबून असतो. बॅटर हलकंसं आंबट आणि फुगलेलं असायला हवं. पीठ किमान ७ ते ८ तास उबदार जागी ठेवून आंबवून घ्या. पीठ जेवढं चांगलं आंबेल, तेवढाच उत्तपा जाळीदार आणि हलका होईल.

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

डोशाच्या पिठापेक्षा उत्तपाचे पीठ थोडे घट्ट असावे. पीठ जास्त पातळ असल्यास तो तव्यावर पसरवताना जाड राहत नाही आणि मऊपणा येत नाही.

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

तवा मध्यम गरम असावा. पीठ टाकण्यापूर्वी तव्यावर पाण्याचा हबका मारून तो सुती कापडाने पुसून घ्या, यामुळे उत्तपा तव्याला चिकटत नाही आणि व्यवस्थित निघतो. तवा खूप जास्त गरम असेल तर उत्तपा लगेच जळतो आणि आतून कच्चा राहतो. मध्यम आचेवर तवा गरम असणं उत्तम.

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

उत्तपा नेहमी मंद ते मध्यम आचेवर भाजावा. वरून भाज्या टाकल्यानंतर त्यावर थोडे तेल सोडा आणि झाकण ठेवून वाफेवर शिजू द्या, यामुळे भाज्या नीट बसतात आणि उत्तपा आतून कच्चा राहत नाही. कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर फार बारीक चिरा. जाड तुकडे असल्यास उत्तपा नीट शिजत नाही. भाज्या आधी बॅटरमध्ये मिसळू नका. हॉटेल स्टाईल उत्तपासाठी भाज्या थेट वरून पसराव्यात. यामुळे उत्तपा कुरकुरीत आणि दिसायला आकर्षक होतो.

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

भाज्या नीट शिजण्यासाठी आणि उत्तपा मऊ होण्यासाठी वरुन झाकण ठेवून १ ते २ मिनिटं शिजवा.

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

डोशासारखाच उत्तपा पसरवण्याची चूक करू नका. बॅटर ओतल्यावर हलकंसं गोलाकार ठेवा, जाडसरच राहू द्या. फक्त हलक्या हाताने गोलाकार फिरवा, जेणेकरून पिठातील हवा टिकून राहील आणि त्याला छान जाळी पडेल.

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

फार कमी तेल घेतल्यास उत्तपा कोरडा होतो, तर जास्त तेल घातल्यास तेलकट लागतो. कडेला आणि मधोमध थोड तेल पुरेसं असतं.

परफेक्ट उडपी स्टाईल उत्तपा करण्याची खास ट्रिक! अण्णाच्या गाडीवर मिळतो त्याहूनही भारी...

उत्तपा तयार करताना बॅटरमध्ये १ टेबलस्पून बारीक रवा आणि तांदुळाचे पीठ घातलं की, उत्तपा बाहेरुन क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होतो. उडपी स्टाइल उत्तपासाठी शेवटी वरुन थोडंसं बटर किंवा लोणी घातल्यास अप्रतिम चव येते.