काही केलं तरी डोसा तव्याला चिकटून करपतो? करा बर्फाची जादू- डोसे होतील पातळ, कुरकुरीत
Updated:May 12, 2025 16:20 IST2025-05-12T16:08:04+5:302025-05-12T16:20:00+5:30

डोसा हा घरातल्या जवळपास सगळ्याच मंडळींचा आवडीचा पदार्थ. त्यामुळे आपण मोठ्या उत्साहाने डोसे करण्याचा घाट घालतो, त्याची अगदी जय्यत तयारी करतो,
पण बऱ्याचदा असं होतं की डोसा करताना पहिला डोसा तव्याला चिकटतो, फाटतो आणि जळून करपतो.
डोसा करण्याची सुरुवातच जर अशा पद्धतीने झाली तर खूपच मूड ऑफ होतो आणि मग पुढचे डोसे करण्याचाही वैताग येतो.
म्हणूनच तुमचा जर मूड घालवायचा नसेल आणि तव्याला न चिकटणारे कुरकुरीत पातळ डोसे करायचे असतील तर ही एक सोपी ट्रिक करा..
हा उपाय करण्यासाठी तवा गरम करायला ठेवा. गरम झालेल्या तव्यावर बर्फ फिरवा. त्यानंतर एखादा कपडा घेऊन बर्फाचं पाणी पुसून टाका आणि त्यानंतर तव्याला तेल लावा
आता यानंतर गॅस मंद आचेवर करा आणि तव्यावर डोशाचं पीठ टाकून ते पसरवून घ्या. डोसा तव्याला मुळीच चिकटून बसणार नाही. ही ट्रिक प्रत्येकवेळी डोसे करताना तुमच्या उपयोगी येईल.