बाजरीची भाकरी थापताना तुटते, फुगत नाही ? ६ ट्रिक्स - भाकरी दिवसभर राहील मऊ - लुसलुशीत फुगेल टम्म...

Updated:November 18, 2025 19:34 IST2025-11-18T19:21:39+5:302025-11-18T19:34:43+5:30

How To Make Perfect Bajrichi Bhakri : 6 tips & tricks for making bajra bhakari : बाजरीची भाकरी अगदी मस्त मऊ, गोल आणि टम्म फुगलेली करण्यासाठी ६ ट्रिक्स...

बाजरीची भाकरी थापताना तुटते, फुगत नाही ? ६ ट्रिक्स - भाकरी दिवसभर राहील मऊ - लुसलुशीत फुगेल टम्म...

बाजरीची भाकरी हा महाराष्ट्राच्या आणि विशेषतः ग्रामीण भागातील आहार संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. हिवाळ्यात बाजरीची भाकरी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. परंतु, अनेकदा गृहिणींना भाकरी मऊ, लुसलुशीत आणि टम्म फुगवणे अवघड काम वाटते. काहीवेळा बाजरीची भाकरी कडक होते, तुटते किंवा नीट फुगत नाही. परंतु योग्य प्रमाण, पाण्याचे तापमान आणि मळण्याची पद्धत इतकी (6 tips & tricks for making bajra bhakari) परफेक्ट असेल तर बाजरीची भाकरी अगदी मस्त मऊ, गोल आणि टम्म फुगलेली होते.

बाजरीची भाकरी थापताना तुटते, फुगत नाही ? ६ ट्रिक्स - भाकरी दिवसभर राहील मऊ - लुसलुशीत फुगेल टम्म...

बाजरीच्या पिठात ग्लूटेन (Gluten) नसते, ज्यामुळे ते गव्हाच्या पिठासारखे सहजपणे (How To Make Perfect Bajrichi Bhakri) मळले जात नाही. सर्वात आधी बाजरीचे पीठ चांगल्या प्रकारे चाळून घ्या. चाळलेले पीठ एका भांड्यात घ्या आणि पिठात मध्यभागी बोटाने गोलाकार आकार करून या गोलामध्ये गरम पाणी घाला आणि त्यानंतर चमचा किंवा हाताने पाणी आणि पीठ एकत्र मिसळून घ्या.

बाजरीची भाकरी थापताना तुटते, फुगत नाही ? ६ ट्रिक्स - भाकरी दिवसभर राहील मऊ - लुसलुशीत फुगेल टम्म...

बाजरीची भाकरी मऊसूत होण्यासाठी पीठ व्यवस्थित मळणे गरजेचे असते. जितकं पीठ मऊ, लवचिक, लुसलुशीत असेल तितकीच भाकरी देखील टम्म आणि मऊ - लुसलुशीत होते. पीठ किमान ५ मिनिटे चांगले मळले पाहिजे. बाजरीचे पीठ मळताना, ते फक्त एकत्र मिसळायचे नाही, तर तळहाताच्या खालच्या भागाचा उपयोग करून ते चांगले चोळून मळून घ्यायचे आहे. यामुळे पीठ मऊ - लुसलुशीत होईल आणि भाकरी तुटणार नाही तर टम्म फुगेल आणि दिवसभर नरम राहील.

बाजरीची भाकरी थापताना तुटते, फुगत नाही ? ६ ट्रिक्स - भाकरी दिवसभर राहील मऊ - लुसलुशीत फुगेल टम्म...

बाजरीची भाकरी गव्हाच्या पोळीसारखी पातळ लाटता येत नाही, कारण ती तुटते. यासाठी एक सोपी आणि उपयुक्त ट्रिक करता येऊ शकते. भाकरी लाटण्यासाठी लाटण्याचा वापर करण्याऐवजी, एक बटर पेपर घ्या. त्यावर थोडेसे कोरडे पीठ शिंपडा. मळलेल्या पिठाचा एक गोळा घ्या, त्यावरही थोडे कोरडे पीठ लावा आणि तो गोळा बटर पेपरवर ठेवा. आता हातांच्या पंजानी दाबून तो गोळा हळूहळू पसरवत जा. या ट्रिकने भाकरी तुटणार नाही आणि गोल आकारही सहजपणे घेईल.

बाजरीची भाकरी थापताना तुटते, फुगत नाही ? ६ ट्रिक्स - भाकरी दिवसभर राहील मऊ - लुसलुशीत फुगेल टम्म...

हाताने भाकरी थापताना तिच्या कडांना हलके तडे जाऊ शकतात. हे तडे घालवण्यासाठी आणि भाकरी गुळगुळीत करण्यासाठी पाण्याचा वापर करावा. भाकरी तव्यावर टाकल्यानंतर हलक्या हाताने पाण्याचा हात फिरवून भाकरीवर लावावा. हे पाणी भाकरीच्या कडांना ओलावा देते आणि तडे भरून काढण्यास मदत करते. भाकरीला पाणी लावल्याने ती मऊसूत व दिवसभर मऊ - लुसलुशीत राहते.

बाजरीची भाकरी थापताना तुटते, फुगत नाही ? ६ ट्रिक्स - भाकरी दिवसभर राहील मऊ - लुसलुशीत फुगेल टम्म...

बाजरीची भाकरी टम्म फुगवणे म्हणजे अनेक गृहिणींना अवघड काम वाटते. भाकरीला तव्यावर एका बाजूने भाजा. जेव्हा एक बाजू शिजेल, तेव्हा तिला पलटून दुसरी बाजू देखील भाजा. जेव्हा भाकरी दोन्ही बाजूंनी हलकी-फुलकी शिजेल, तेव्हा तिला तव्यावरच हलके दाबून भाजा किंवा थेट आचेवर टाका. हलका-हलका दाब दिल्याने, आतील वाफ बाहेर पडू शकत नाही आणि भाकरी फुग्यासारखी टम्म फुगते.

बाजरीची भाकरी थापताना तुटते, फुगत नाही ? ६ ट्रिक्स - भाकरी दिवसभर राहील मऊ - लुसलुशीत फुगेल टम्म...

बाजरीच्या भाकरीसाठी पीठ मळताना पिठात १ टेबलस्पून तूप टाकल्यास भाकरी अधिक मऊ - लुसलुशीत होते. तूपामुळे भाकरीला नॅचरल सॉफ्टनेस येतो.