पराठा कडक- वातड होतो? ४ टिप्स लक्षात ठेवा- पराठा फुगेल टम्म, चवीलाही मस्त
Updated:September 15, 2025 17:30 IST2025-09-15T17:26:06+5:302025-09-15T17:30:39+5:30
How to make perfect paratha: How to make perfect paratha :घरी पराठा ट्राय करत असू आणि तो कडक होत असेल तर कणिक मळताना ६ टिप्स लक्षात ठेवा.

पराठा हा भारतीय जेवणातील असा पदार्थ आहे जो नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सहज खाल्ला जातो. भारतातील अनेक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो. हॉटेलसारखा किंवा ढाब्यावर मिळणारा पराठा आपण अनेकदा घरी ट्राय करण्याचा प्रयत्न करतो. (How to make perfect paratha)
घरी पराठा केल्यानंतर तो कडक आणि वातड होतो. किंवा जास्त फुगत नाही. त्यामुळे त्याची चव देखील बिघडते.(Soft paratha recipe)आपण देखील घरी पराठा ट्राय करत असू आणि तो कडक होत असेल तर कणिक मळताना ६ टिप्स लक्षात ठेवा.(How to make perfect paratha)
पराठे बनवताना पिठाचे छोटे गोळे बनवा आणि त्यावर कोरडे पीठ लावून लाटून घ्या. यामुळे लाटायला सोपे जाईल. पराठे जास्त दाबाने लाटू नका, कारण यामुळे ते काही ठिकाणी जाड होतील तर काही ठिकाणी खूप पातळ होतील.
पराठा गोल लाटल्यानंतर त्यावर थोडे तेल आणि कोरडे पीठ लावा. यानंतर पराठा मधून दुमडून घ्या. पुन्हा तेल आणि कोरडे पीठ लावा. त्रिकोणी आकारात पराठा लाटायचा आहे.
जर आपल्याला पराठ्याला तिखट बनवायचे असेल तर तेल आणि पीठाऐवजी आपण लाल मिरची पावडर, चाट मसाला, कसुरी मेथी, धणे पावडर, बडीशेप पावडर लावू शकतो. यामुळे पराठा आणखी टेस्ट होतो.
पराठा नेहमी मंद आचेवर भाजावा. दोन्ही भाजूने हलके भाजून मग तूप किंवा तेल लावून दुसऱ्या बाजूने भाजा.