सणावाराला पुऱ्या करता पण बेत फसतो? तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्यांसाठी 'असं' पीठ मळा...

Updated:August 4, 2025 19:19 IST2025-08-04T19:07:50+5:302025-08-04T19:19:34+5:30

How to Make Non-Oily & Fluffy Puri at Home : How to make fluffy puri at home : Homemade puri without excess oil : Tips for puffed and light puris : Healthy puri recipe at home : पुऱ्या खूपच तेलकट होतात, व्यवस्थित फुगत नाहीत यासाठी 'अशा' पद्धतीने पुऱ्यांचे पीठ मळून पाहा...

सणावाराला पुऱ्या करता पण बेत फसतो? तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्यांसाठी 'असं' पीठ मळा...

श्रावण महिना म्हणजे सणावारांची रेलचेल, पूजाअर्चा आणि घराघरांत (How to Make Non-Oily & Fluffy Puri at Home) मस्त असा गोडाधोडाच्या जेवणाचा चविष्ट बेत! काही खास प्रसंग, किंवा सणवार असेल तर जेवणाचा बेत प्रत्येक घरोघरी केला जातो, हा बेत पुऱ्यांशिवाय (How to make fluffy puri at home) अपूर्णच आहे. मस्त, गरमागरम, टम्म फुगलेल्या पुऱ्या खाण्याचा मोह कुणालाही आवरता येत नाही. परंतु पुऱ्या करताना बरेचदा त्या व्यवस्थित फुगत नाहीत, खूपच तेलकट होतात - अशा तेलकट, न फुगलेल्या पुऱ्या खायला नकोसे वाटते.

सणावाराला पुऱ्या करता पण बेत फसतो? तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्यांसाठी 'असं' पीठ मळा...

पण काळजी करू नका, काही सोप्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून आपण टम्म फुगलेल्या आणि अजिबात तेलकट न होणाऱ्या पुऱ्या घरच्याघरीच तयार करु शकतो. यासाठी पीठ मळताना काही खास गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. पीठ योग्य पद्धतीने मळल्यास पुऱ्या खुसखुशीत आणि कमी तेलकट होतात.

सणावाराला पुऱ्या करता पण बेत फसतो? तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्यांसाठी 'असं' पीठ मळा...

पुऱ्या तेलकट न होता खरपूस, टम्म फुगलेल्या आणि कुरकुरीत (Homemade puri without excess oil) होण्यासाठी पीठ कसं मळावं, त्यात कोणते खास पदार्थ घालावेत आणि तळताना कोणती खबरदारी घ्यावी ते पाहूयात.

सणावाराला पुऱ्या करता पण बेत फसतो? तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्यांसाठी 'असं' पीठ मळा...

पुऱ्या तयार करण्यासाठी पीठ मळताना, जर ३ वाटी (Tips for puffed and light puris) गव्हाचे पीठ असेल तर त्यात १ वाटी बारीक रवा, १ टेबलस्पून साखर, १ टेबलस्पून लिंबाचा रस, व चवीनुसार मीठ घालावे.

सणावाराला पुऱ्या करता पण बेत फसतो? तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्यांसाठी 'असं' पीठ मळा...

गव्हाच्या पिठात वरील सर्व पदार्थ घालून एकत्रित करून, गरजेनुसार पाणी घालून पीठ व्यवस्थित घट्ट मळून घ्यावे.

सणावाराला पुऱ्या करता पण बेत फसतो? तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्यांसाठी 'असं' पीठ मळा...

पुऱ्यांसाठीचे पीठ मळून झाल्यावर त्यावर हलकासा ओला छोटा सुती रुमाल घालून किंवा झाकण ठेवून झाकून ठेवावे.

सणावाराला पुऱ्या करता पण बेत फसतो? तेल न पिणाऱ्या, टम्म फुगलेल्या पुऱ्यांसाठी 'असं' पीठ मळा...

या उपायामुळे पुरी छान फुगते, तेलकट होत नाही आणि बराचवेळ फुललेली राहते.