1 / 8बऱ्याचदा असा अनुभव येतो की फ्रिजमध्ये ठेवूनही भाज्या २ ते ३ दिवसांतच खराब होतात. कारण आपण त्या चुकीच्या पद्धतीने साठवून ठेवतो. म्हणूनच कोणती भाजी कशा पद्धतीने साठवून ठेवायची याविषयी या काही खास टिप्स पाहा.. 2 / 8पालक, मेथी अशा भाज्या पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळा आणि मग त्या झिप लॉक बॅगमध्ये ठेवून फ्रिजमध्ये ठेवा. आठवडाभर भाज्या अगदी फ्रेश राहतील.3 / 8टोमॅटोच्या देठाला थोडेसे तेल लावून ठेवा. टोमॅटो ७ ते ८ दिवस अगदी छान टिकतात. 4 / 8फ्रिजमध्ये ठेवलेलं आलंही काही दिवसानंतर सुकून जातं. असं होऊ नये म्हणून आलं एका एअरटाईट डब्यात ठेवा आणि त्या डब्यामध्ये एका पेपर नॅपकिनमध्ये थोडं मीठ गुंडाळून ठेवा. आलं फ्रेश राहील. 5 / 8कोथिंबीर जास्तीत जास्त दिवस फ्रेश ठेवण्यासाठी तिच्या देठाकडचा थोडासा भाग कापून घ्या आणि ती एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घालून त्यामध्ये ठेवून द्या. कोथिंबीरीवरून एक प्लास्टिकची पिशवी किंवा काचेचे भांडे लावा. 6 / 8लिंबू एक ते दोन महिने अगदी फ्रेश ठेवण्यासाठी एक काचेची बरणी घ्या. त्यात लिंबू टाकून पाणी भरा आणि झाकण लावून ही बरणी फ्रिजमध्ये ठेवून द्या. 7 / 8बटाट्यांना कोंब येऊ नयेत म्हणून बटाट्यांमध्ये एखादे सफरचंद टाकून ठेवा. बटाटे जास्तीत जास्त दिवस फ्रेश राहतील.8 / 8हिरव्या मिरच्यांची देठं काढून घ्या. त्यानंतर मिरच्या पेपर नॅपकिनमध्ये गुंडाळा आणि काचेच्या एअरटाईट डबीमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवा. मिरच्या महिनाभर फ्रेश राहतील.