प्रत्येक महिलेने रोज खायलाच पाहिजेत 'हे' पदार्थ, चाळिशीनंतरही राहाल तरुण, निरोगी- दिसाल सुंदर
Updated:June 4, 2025 12:43 IST2025-06-04T12:30:57+5:302025-06-04T12:43:33+5:30

चाळिशी आली की वाढत्या वयाच्या खाणाखुणा दिसायला सुरुवात होते, त्वचेवर बारीकशा सुरकुत्या दिसतात, केस पांढरे होऊन गळायला लागतात. गुडघे, पाठ, कंबर यांच्या कुरबुरीही वाढायला लागतात.
याचं कारण म्हणजे शरीरातला इस्ट्रोजीन हा हार्मोन कमी हाेत जातो. हा हार्मोन कमी झाल्यामुळे मग वरील सगळी लक्षणं शरीरात दिसू लागतात. म्हणूनच शरीरातली इस्ट्रोजीनची पातळी चांगली राहावी आणि आपणही दिर्घकाळ तरुण, निरोगी आणि सुंदर राहावं यासाठी काही पदार्थ खाणं गरजेचं आहे.(7 foods that helps to maintain health, beauty and fitness of woman)
हे पदार्थ जर तुम्ही नियमितपणे खाल्ले तर शरीरातली इस्ट्रोजीनची पातळी योग्य प्रमाणात राहण्यास मदत होते आणि ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती तज्ज्ञ डॉक्टरांनी dr.snehanjali या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(how to improve Beauty Hormone-Estrogen level in body?)
सोयाबीन, तीळ, खसखस हे पदार्थ कोणत्या ना कोणत्या माध्यमातून नियमितपणे खायला हवे.
रोजच्या रोज जवस खाणेही सौंदर्य आणि आरोग्य जपण्यासाठी अतिशय गरजेचे आहे.
ओट्सदेखील एक उत्तम आहार आहे. नाश्त्याला ओट्सचे वेगवेगळे पदार्थ खाणंही फायद्याचं ठरतं.
ब्रोकोली, पत्ताकोबी, फुलकोबी या भाज्यांमुळेही शरीरातली इस्ट्रोजीनची पातळी संतुलित राहण्यास मदत होते.
गाजर, बीट हे सलाडही नियमितपणे खावे. त्यासोबतच रताळे आणि बटाटेही आपल्या आहारात असायला हवे.
सुकामेव्यामध्ये बदाम, पिस्ता, अक्रोड, काळ्या मनुका, बेदाणे हे पदार्थ खाणंही उत्तम ठरतं.
बेरीयुक्त फळं खाणंही अधिक फायद्याचं ठरतं.
या सगळ्या आहारासोबत नियमितपणे व्यायामही केला तर नक्कीच वय वाढलं तरी तुम्ही तरुण आणि सुंदरच दिसाल.