पनीरमधली भेसळ ओळखण्याच्या ५ टेस्ट, शेफ पंकज सांगतात नकली पनीर कसे ओळखायचे...
Updated:May 12, 2025 17:12 IST2025-05-11T07:03:35+5:302025-05-12T17:12:57+5:30
How to identify fake paneer and real paneer : How to identify fake paneer at home 5 simple tests : Is your paneer fake? 5 ways to spot it at home before it's too late : Pankaj ke Nuskhe: How to Check Paneer for Adulteration : पनीर मधील भेसळ ओळखणे सोपे, घरीच करुन पाहा या ५ टेस्ट आणि करा अस्सल पनीरची योग्य निवड...

घरी तयार केलेलं पनीर हे कायम ताजे व शुद्ध असते. या घरगुती पनीरचे (How to identify fake paneer and real paneer) केले जाणारे पदार्थ हे चवीला अतिशय छान लागतात. याउलट विकतचे पनीर आणले तर ते काहीवेळा खराब किंवा नासलेले असते.
विकतचे पनीर आणल्यावर ते काहीवेळा फारच रुक्ष आणि (How to identify fake paneer at home 5 simple tests) कठीण असते. तर काहीवेळा त्यातून आंबट दुर्गंधी येऊन ते अधिक चिकट होते. विकत आणलेले पनीर शुद्ध आहे की भेसळयुक्त ? तसेच पनीर नासलेले तर नाही ना ते चांगल्या दर्जाचे आहे का हे तपासून पाहण्यासाठी काही खास टिप्स...
सुप्रसिद्ध मास्टरशेफ पंकज भदौरिया यांनी त्यांच्या masterchefpankajbhadouria या इंस्टाग्राम अकाऊंटवरून, विकतचे पनीर भेसळयुक्त आहे की नाही हे कसे ओळखावे यासाठी ४ ट्रिक्स सांगितल्या आहेत. भेसळयुक्त पनीर ओळखण्यासाठी नेमकं काय करावं ते पाहा...
१. स्टार्च टेस्ट :-
पनीरमधील स्टार्चची भेसळ ओळखण्यासाठी ही ट्रिक करावी. यासाठी हलक्या गरम पाण्यांत पनीरचा तुकडा घालूंन तो हलकासा गरम करून घ्यावा. या गरम पनीरच्या तुकड्यावर आयोडीनचे द्रावण घालावे. आयोडीनचे द्रावण घातल्यानंतर जर पनीरचा रंग बदलून काळा झाला तर समजावे की पनीर तयार करण्यासाठी स्टार्चचा वापर केला आहे.
२. तूर डाळ टेस्ट :-
पनीर मधील भेसळ ओळखण्यासाठी तूर डाळ फायदेशीर ठरते. यासाठी गरम पाण्यात पनीर हलकेच भिजवून घ्यावे. त्यानंतर तूर डाळीचे पीठ पनीरच्या तुकड्यावर भुरभुरवून घ्यावे. जर या पिठाचा पिवळा रंग बदलून हलकासा लालसर झाला तर समजावे की हे पनीर भेसळयुक्त आहे, आणि असे पनीर तयार करण्यासाठी डिटर्जंट पावडरचा वापर केला जातो. पनीर तयार करताना डिटर्जंट पावडरचा वापर केला आहे की नाही हे ओळखण्यासाठी ही तूर डाळीची टेस्ट अतिशय फायदेशीर ठरेल.
३. टेक्श्चर टेस्ट :-
भेसळयुक्त पनीर हाताने दाबून पाहिल्यास थोडेसे रुक्ष, कोरडे आणि रबरासारखे तसेच हाताला चिकट लागते. याउलट शुद्ध पनीर हाताला मऊमुलायम लागते. शुद्ध पनीर मऊमुलायम आणि नरम असते.
४. सुगंध तपासा :-
आपण पनीरचा सुगंध घेऊन देखील पनीरची शुद्धता ओळखू शकतो. भेसळयुक्त पनीर मधून दुधाचा वास येत नाही याउलट शुद्ध आणि ताज्या पनीर मधून दुधाचा हलकासा वास येतो. जर पनीर मधून असा हलकासा दुधाचा वास येत असेल तर ते पनीर भेसळयुक्त नाही असे समजावे.
५. हिट टेस्ट :-
पनीरचा छोटा तुकडा घेऊन तो गरम तव्यावर काही मिनिटांसाठी ठेवून द्या. पनीर जर शुद्ध असेल तर ते गरम होऊन त्यातील जास्तीचे पाणी बाहेर टाकेल. त्याचबरोबर त्या तुकड्याचा शेप न बिघडता तो आहे तसाच राहील. याउलट, भेसळयुक्त पनीरच्या तुकड्याचा शेप बिघडेल व ते कोरडे पडेल.