1 / 7भाजी किंवा वरण कोणतंही केलं तरी त्याला वेगळा स्वाद आणण्यासाठी आपण कोथिंबीर आलं, कढीपत्ता यांचा वापर करतो.2 / 7हे पदार्थ असे आहेत की ते बहुसंख्य पदार्थांमध्ये घातले जातात आणि त्यांच्यामुळे त्या पदार्थाची चव, सुगंध आणखी खुलते. पण बऱ्याचदा असं होतं की स्वयंपाक करताना ऐनवेळी लक्षात येतं की घरात कोथिंबीर, आलं किंवा कढीपत्ताच नाहीये.3 / 7किंवा बऱ्याचदा हे पदार्थ महाग झाल्यानेही आपण ते घेणं टाळतो. अशावेळी हे ३ पदार्थ घरात नाहीत, म्हणून अडून बसू नका. त्याऐवजी हा एक खास उपाय करा. 4 / 7हे पदार्थ जेव्हा घरात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात, तेव्हा त्यांच्या पावडर करून ठेवा. या पावडर एखादा महिना तरी आरामात टिकतात.जेव्हा हे पदार्थ घरात नसतात, तेव्हा त्यांच्या पावडर वापरा आणि पदार्थांना वेगळी चव द्या. आता या पदार्थांच्या पावडर कशा करायच्या ते पाहूया...5 / 7कोथिंबीरीची पावडर करायची असेल तर सगळ्यात आधी कोथिंबीर स्वच्छ निवडून घ्या आणि कोवळ्या उन्हात वाळवायला ठेवा. २ ते ३ दिवस चांगली वाळली की तिची पावडर करून घ्या.6 / 7कढीपत्त्याची पावडर करण्यासाठीही कोथिंबीरीच्या पावडरीसारखेच करावे. कढीपत्ता चांगला वाळू द्यावा. आणि त्यानंतर मिक्सरमधून बारीक करून त्याची पावडर करून घ्यावी.7 / 7आल्याची पावडर करायची असेल तर आले मोठ्या किसनीने किसून घ्या. त्यानंतर ते कढईत टाकून भाजून घ्या. त्याच्यातले पाणी पुर्णपणे शोषले जाईपर्यंत आलं भाजून घ्यावं. ते संपूर्णपणे कोरडं झालं की मग थंड होऊ द्यावं आणि नंतर मिक्सरमध्ये फिरवून त्याची पावडर करून घ्यावी.