काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही, खा 'रताळी' नावाचं सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत

Updated:January 6, 2026 19:22 IST2026-01-06T19:08:54+5:302026-01-06T19:22:59+5:30

Sweet Potato Benefits: रताळं हे वजन वाढवणारं नसून योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ल्यास ते वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं.

काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही, खा 'रताळी' नावाचं सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत

सहसा वजन कमी करायचं म्हटलं की, आपण आहारात कार्बोहायड्रेट्स घेणं बंद करतो. अशा वेळी बटाट्यासारखं दिसणारे 'रताळं' खाल्ल्याने वजन वाढतं, असा अनेकांचा समज असतो. मात्र, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे.

काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही, खा 'रताळी' नावाचं सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत

रताळं हे वजन वाढवणारं नसून योग्य प्रमाणात आणि योग्य वेळी खाल्ल्यास ते वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. पोषक तत्वांनी भरपूर असलेल्या रताळ्यामध्ये फायबर, जीवनसत्त्वं आणि चांगले कार्ब्स असतात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि पोट जास्त वेळ भरलेले ठेवतात.

काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही, खा 'रताळी' नावाचं सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत

जर तुम्हाला वजन घटवायचं असेल, तर रताळं खाण्याची सर्वोत्तम पद्धत म्हणजे ते उकडून किंवा हलकं भाजून खाणं. उकडलेल्या रताळ्यामध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबरचं प्रमाण भरपूर असतं.

काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही, खा 'रताळी' नावाचं सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत

रताळ्याचे चिप्स बनवून खाणं किंवा ते जास्त तेल-तुपात तळून खाल्ल्यास शरीराचे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे चवीपेक्षा आरोग्याला अधिक महत्त्व देणं गरजेचं आहे.

काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही, खा 'रताळी' नावाचं सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत

रताळे खाण्याची वेळ देखील महत्त्वाची असते. तज्ज्ञांच्या मते, रताळे सकाळच्या नाश्त्यात किंवा दुपारच्या जेवणात खाणे सर्वात उत्तम आहे. कारण या वेळी शरीराला ऊर्जेची जास्त गरज असते आणि आपण सक्रिय असतो.

काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही, खा 'रताळी' नावाचं सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत

रात्री उशिरा रताळं खाणं शक्यतो टाळावं, कारण रात्री शरीर कमी सक्रिय असल्याने वजन वाढण्याची जास्त शक्यता असते.

काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही, खा 'रताळी' नावाचं सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत

रताळं आरोग्यासाठी फायदेशीर असले तरी, त्याचं अतिसेवन नुकसानदायक ठरू शकते. एका वेळी साधारण १०० ते १५० ग्रॅम रताळं आपल्या आहारात समाविष्ट करणं पुरेसं आहे.

काहीही केलं तरी वजन कमीच होत नाही, खा 'रताळी' नावाचं सुपरफूड; 'ही' आहे खाण्याची योग्य पद्धत

अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही ते दही, कोशिंबीर किंवा हिरव्या पालेभाज्यांसोबत खाऊ शकता. यामुळे शरीरातील पोषणाचं संतुलन राखलं जातं आणि ब्लड शुगर देखील नियंत्रणात राहते.