महाराष्ट्राची पुरणपोळी तर राजस्थानच्या गुज्जिया, बघा होळीस्पेशल पदार्थ- सांगा तुमच्या आवडीचा कोणता?

Updated:March 11, 2025 15:33 IST2025-03-11T15:25:18+5:302025-03-11T15:33:26+5:30

महाराष्ट्राची पुरणपोळी तर राजस्थानच्या गुज्जिया, बघा होळीस्पेशल पदार्थ- सांगा तुमच्या आवडीचा कोणता?

सणावारानुसार आपल्याकडे वेगवेगळ्या पदार्थांना महत्त्व असते. त्यातही आपली खाद्यसंस्कृती एवढी वैभवशाली आहे की प्रत्येक प्रांतात कोणता ना कोणता वेगळा पदार्थ होळी सणाच्या निमित्ताने चाखायला मिळतो..(Holi special traditional food in different states of India)

महाराष्ट्राची पुरणपोळी तर राजस्थानच्या गुज्जिया, बघा होळीस्पेशल पदार्थ- सांगा तुमच्या आवडीचा कोणता?

आता हेच पाहा ना होळीचा सण म्हटला की महाराष्ट्रात घरोघरी केली जाते ती पुरणाची पोळी.. आता याचप्रमाणे वेगवेगळ्या राज्यांमध्ये कोणकोणते खास पदार्थ खाऊन होळी साजरी केली जाते ते पाहूया..

महाराष्ट्राची पुरणपोळी तर राजस्थानच्या गुज्जिया, बघा होळीस्पेशल पदार्थ- सांगा तुमच्या आवडीचा कोणता?

होळीच्या दिवशी उत्तरप्रदेश, राजस्थान या भागात गुज्जिया हा पदार्थ केला जातो. खवा, नारळ घालून तयार केलेली ती एकप्रकारची करंजीच असते.

महाराष्ट्राची पुरणपोळी तर राजस्थानच्या गुज्जिया, बघा होळीस्पेशल पदार्थ- सांगा तुमच्या आवडीचा कोणता?

बिहार, ओडिसा, बंगाल या प्रांतात मुगलाई खाद्यसंस्कृतीची झलक दाखविणारा मालपुआ होळीनिमित्त केला जातो. तिन्ही राज्यांत मालपुआ करण्याची पद्धत थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी आहे.

महाराष्ट्राची पुरणपोळी तर राजस्थानच्या गुज्जिया, बघा होळीस्पेशल पदार्थ- सांगा तुमच्या आवडीचा कोणता?

उत्तरेकडच्या काही राज्यात होळीनिमित्त दहीवडा किंवा दही भल्ला करण्याची प्रथा आहे.

महाराष्ट्राची पुरणपोळी तर राजस्थानच्या गुज्जिया, बघा होळीस्पेशल पदार्थ- सांगा तुमच्या आवडीचा कोणता?

होळीनिमित्त जवळपास सगळीकडेच थंडाई केली जाते. काही प्रांतात त्यामध्ये भांग घालतात तर काही भागात गुलाबाच्या पाकळ्या आणि सुकामेवा घालून थंडाई केली जाते. या सणाच्या आसपास वातावरण गरम झालेलं असतं. त्यामुळे अंगातला दाह कमी करण्यासाठी थंडाई पिणे उपयुक्त मानले जाते.

महाराष्ट्राची पुरणपोळी तर राजस्थानच्या गुज्जिया, बघा होळीस्पेशल पदार्थ- सांगा तुमच्या आवडीचा कोणता?

उत्तरप्रदेश, राजस्थान या भागात होळीच्या दिवशी कचोरीसुद्धा केली जाते.

महाराष्ट्राची पुरणपोळी तर राजस्थानच्या गुज्जिया, बघा होळीस्पेशल पदार्थ- सांगा तुमच्या आवडीचा कोणता?

पंजाबमध्ये होळीच्या दिवशी मक्के की रोटी, सरसोंका साग आणि खुसखुशीत खमंग बेसन शेव हा मेन्यू असतो..