आरोग्य सांभाळा! 'या' खाद्यपदार्थांमध्ये असते भरपूर साखर; शरीरासाठी घातक, वाढू शकतं वजन
Updated:December 24, 2024 17:51 IST2024-12-24T17:42:40+5:302024-12-24T17:51:49+5:30
जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमध्ये साखर असते...

आवश्यकतेपेक्षा जास्त साखर खात असाल तर काळजी घ्या. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणासारखे धोकादायक आजार होऊ शकतात. तसेच ती शरीरासाठी घातक ठरू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलं आहे की, दिवसाला ५० ग्रॅमपेक्षा जास्त साखर आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकते. तर, एक भारतीय एका वर्षात सरासरी २० किलो साखर आणि एक अमेरिकन ४५ किलो साखर वापरतो.
बहुतेक लोकांना असं वाटतं की साखरच गोड असते. हे पूर्णपणे खरं नसलं तरी दैनंदिन जीवनात साखरेव्यतिरिक्त कोल्ड्रिंक्स, कुकीज, बिस्किटे आणि ब्रेड यांसारख्या गोष्टींमध्येही भरपूर साखर असते. जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमध्ये साखर असते...
कोल्ड ड्रिंक किंवा ज्यूस
५०० मिली कोल्ड ड्रिंकमध्ये ५० ग्रॅमपेक्षा जास्त साखर असू शकते, जी साखरेच्या दैनंदिन प्रमाणापेक्षा जास्त आहे. याशिवाय सोडा, ज्यूस आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये भरपूर शुद्ध साखर असते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज झपाट्याने वाढतं. यामुळे वजन आणि मधुमेहाचा धोकाही वाढतो.
कँडी-चॉकलेट
कँडी, चॉकलेट आणि मिठाई यांसारख्या पदार्थांमध्येही साखर आढळते. ते जास्त प्रमाणात खाणे धोकादायक ठरू शकतं. या सर्वांमुळे ग्लुकोजची लेव्हल वाढू शकते.
सॅच्युरेटेड फॅट असलेले डेअरी प्रोडक्ट
दुग्धजन्य पदार्थ हे निरोगी अन्न मानले जातात, परंतु दूध, पनीर आणि क्रीममध्ये सॅच्युरेटेड फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. ज्यामुळे वजन वाढू शकतं.
बटाटा चिप्स
बटाट्याच्या चिप्स आणि इतर पॅकेज केलेल्या स्नॅक्समध्ये रिफाइंड कार्बोहायड्रेट्स, अनहेल्दी फॅट्स आणि मीठ जास्त असतं. याच्या अतिसेवनाने रक्तातील साखरेची लेव्हल अनकंट्रोल होऊ शकते.
व्हाईट ब्रेड
व्हाईट ब्रेडआणि पेस्ट्रीमध्येही भरपूर साखर आढळते. या दोन्ही गोष्टी मैद्यापासून बनवल्या जातात, ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते आणि इन्सुलिन रेझिस्टन्सची समस्या देखील उद्भवू शकते.
पांढरा तांदूळ
पांढरा तांदूळ पॉलिश केल्यावर त्यातील फायबर, जीवनसत्त्वे आणि मिनरल्स निघून जातात. त्यामुळे ते हाय ग्लायसेमिक फूड बनतं. यानंतर, त्याचे नियमित सेवन रक्तातील साखरेची लेव्हल वाढवू शकतं.
तळलेले पदार्थ
समोसे, जिलेबी यांसारख्या तळलेल्या पदार्थांमध्ये अनहेल्दी फॅट्सचं प्रमाण जास्त असतं. याचं सेवन केल्याने सूज येणं, कोलेस्ट्रॉल आणि इन्सुलिन रेझिस्टन्ससारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे मधुमेहाचा त्रास होऊ शकतो.