लाल भोपळ्याच्या बिया म्हणजे शरीरासाठी जादू! डांगर खा, आणि बिया कधीच फेकू नका..
Updated:March 6, 2025 21:43 IST2025-03-06T21:34:19+5:302025-03-06T21:43:13+5:30
Health Benefits Of Pumpkin Seeds : लाल भोपळ्याच्या बिया म्हणजे जणू आरोग्यासाठी वरदानच. फारच पौष्टिक असतात.

भोपळ्याच्या बिया शरीरासाठी फार उपयुक्त असतात. आपण भोपळा खाल्ला की बिया फेकून देतो. पण त्या फेकू नका. त्या वाळवून घ्या व खा.
भोपळ्याच्या बिया बाजारात विकत मिळतात. सहज उपलब्ध होतात. त्या विकत आणा. रोज चार बिया खा.
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर गुणधर्म असतात. जीवनसत्वे असतात. हेल्थलाईनच्या पेजवरील मजकूरानुसार भोपळ्याच्या बियांचे फायदे वैज्ञानिक रित्या सिद्ध झाले आहेत.
शाकाहारी लोकांसाठी तर हा खजिनाच आहे. या बियांमध्ये भरपूर प्रोटिन असते.
या बियांमध्ये मॅग्नेशियम असते. त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. हाडे मजबूत होतात.
भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. जीवनसत्त्व ई असते. बेटा कॅरेटिन असते. पेशींसाठी ते उपयुक्त ठरते.
कॅन्सरच्या विषाणूंविरूद्ध शरीराला लढण्यासाठी या बियांमुळे ताकद मिळते. इतरही अनेक आजर दूर ठेवण्यासाठी मदत होते.
भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रायपटोफॅन नामक पदार्थ असतो. ज्यामुळे झोप छान लागते.
भोपळ्याच्या बियांमध्ये झींक असते. त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढते.
कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्यासाठी या बिया खाणे नक्कीच फायदेशीर ठरते.