Join us

ओट्स खराब न होता, जास्त दिवस राहतील चांगले, ८ टिप्स - ओट्स टिकतील अनेक महिने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2025 14:05 IST

1 / 10
आजकाल बरेचजण हेल्दी आणि पौष्टिक म्हणून नाश्त्याला ओटस खाणे पसंत करतात. फायबर आणि प्रथिनेयुक्त असलेले हे सुपरफूड प्रामुख्याने वजन कमी करण्यासाठी आहारात समाविष्ट केले जाते.
2 / 10
अनेकदा आपण ओटस दररोज लागतात म्हणून एकदम एकाचवेळी भरपूर प्रमाणात स्टोअर करुन ठेवतो. परंतु काही दिवसांनी या स्टोअर करुन ठेवलेल्या ओटसना वास येऊ लागतो किंवा त्यात अळ्या तयार होतात. असे होऊ यासाठी ओटस कसे स्टोअर करावेत ते पाहूयात.
3 / 10
ओट्स जास्त दिवस चांगले टिकवून ठेवण्यासाठी ते प्लास्टिक किंवा स्टीलच्या कंटेनरऐवजी हवाबंद काचेच्या बरणीत किंवा BPA- फ्री प्लास्टिक कंटेनरमध्ये स्टोअर करावेत. यामुळे हवा आणि ओलावा आत जाण्यापासून रोखला जाईल आणि ओट्स जास्त दिवस फ्रेश राहतील.
4 / 10
ओट्स योग्यरित्या साठवण्यासाठी, त्यांना थंड आणि कोरड्या जागी ठेवणे खूप महत्वाचे असते. ते ओलसर ठिकाणी ठेवल्याने त्यात बुरशी किंवा कीटक, अळ्या होऊ शकतात.
5 / 10
जर तुम्हाला ओट्स ६ महिन्यांपेक्षा जास्त काळ साठवायचे असतील तर ते फ्रिजमध्ये ठेवा. ओट्स फ्रिजमध्ये ठेवल्याने ते ओले होत नाहीत आणि त्यात तयार होणाऱ्या कीटकांपासूनही त्यांचे संरक्षण होते.
6 / 10
ओट्स ज्या डब्यांत ठेवले आहेत त्यात तमालपत्र ठेवा. तमालपत्राचा वास लहान कीटक आणि अळ्यांना दूर ठेवतो, ज्यामुळे ओट्स जास्त काळ खराब न होता चांगले टिकून राहतात. तमालपत्रांचा सुगंध कमी झाल्यावर ते बदलत रहा. यामुळे ओट्स ताजे आणि फ्रेश राहतील.
7 / 10
सिलिका जेलचे पॅकेट बहुतेकदा ओलावा शोषण्याचे काम करते. ओट्स साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कंटेनरमध्ये तुम्ही सिलिका जेलचे पॅक ठेवू शकता.
8 / 10
जर तुमच्याकडे मोठ्या प्रमाणात ओट्स असतील तर ते छोट्या वेगवेगळ्या भागांमध्ये विभागून कंटेनरमध्ये स्टोअर करा. यामुळे संपूर्ण बरणी पुन्हा पुन्हा उघडण्याची गरज भासणार नाही आणि ओट्स जास्त दिवस चांगले टिकून राहतील.
9 / 10
बऱ्याचदा ओट्सच्या डब्यातून वास येतो कारण आपण ते स्वच्छ न करता नवीन ओट्स त्यात वरुन ओतून भरत राहतो. जर बरणीत जुने ओट्स असतील तर ते ओट्स आधी वापरावेत . यानंतर, बरणी स्वच्छ करुन मगच, त्यात ताजे ओट्स भरुन स्टोअर करा.
10 / 10
ओट्स खराब होऊ नयेत जास्त दिवस चांगले टिकावेत यासाठी मिठाची छोटीशी पुडी बांधून ओटसच्या बरणीत ठेवावी.
टॅग्स : अन्नकिचन टिप्सकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.