Join us

Guru Purnima 2025 Prasad: नैवैद्यासाठी करा हे ७ पदार्थ, प्रेमानं केलेला गोड पदार्थ गुरुचरणी करा अर्पण मनोभावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2025 14:46 IST

1 / 8
गुरुपौर्णिमा म्हणजे गुरू शिष्यातील नात्याचा सण. आयुष्याला दिशा देणाऱ्या गुरुला मानवंदना देण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. गुरु प्रतिचा आदर, प्रेम, आपुलकी व्यक्त करण्यासाठी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
2 / 8
गावोगावी गुरुपौर्णिमेला गोडाचा मऊ मस्त असा शिरा केला जातो. केळी, वेलची आणि भरपूर सुकामेवा घालून शिरा केला जातो. चवीला मस्तच लागतो. अनेक ठिकाणी प्रसादाला शिराच केला जातो.
3 / 8
पंजाबमध्ये वारंवार केला जाणारा खडा प्रसाद (गव्हाचा शिरा) गुरुपौर्णिमेसाठी करु शकता. झटपट तर होतोच शिवाय चवीला फारच मस्त असतो. फार वेगळी सामग्री वापरावी लागत नाही. घरी उपलब्ध असणारे पदार्थ वापरले जातात.
4 / 8
दूध, दही, तूप, मध , साखर असे पदार्थ घालून पंचामृत केले जाते. अनेक सणांना पंचामृत केले जाते. शुभ प्रसंगी पंचामृत करण्याची पद्धत आहे. गुरुपौर्णिमेसाठीही पंचामृत केले जाते. प्रसाद म्हणून तुम्हीही नक्की करु शकता.
5 / 8
झटपट होणारा पदार्थ आणि सगळ्यांच्याच आवडीचा असलेला पदार्थ म्हणजे खीर. शेवयांची घट्ट आणि भरपूर सुकामेवा घातलेली खीर प्रसादासाठी नक्कीच करु शकता. चवीला एकदम लाजबाब लागते.
6 / 8
अत्यंत चविष्ट असा पदार्थ म्हणजे बदाम हलवा. एकदम मस्त आणि करायलाही सोपा. बदाम हलव्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी प्रचंड मागणी असते. बाजारात तो मोठ्या प्रमाणावर विकला जातो.
7 / 8
फार पूर्वीपासून गोडाचा पदार्थ करायचे ठरल्यावर गूळ पोहे केले जातात. गावांमध्ये आजही हा पदार्थ फार आवडीने खाल्ला जातो. पोहे, गूळ, नारळ, दूध असे साधे पदार्थ वापरुन गूळ पोहे केले जातात. करायला एकदम सोपे आहेत आणि चव फारच छान असते.
8 / 8
महाराष्ट्रात साखरभात हा पदार्थ फार आवडीने केला जातो आणि खाल्लाही जातो. कोकणात भरपूर नारळ घालून केला जातो. तर काही ठिकाणी सुकामेवा घालून केला जातो. दूध घालूनही केला जातो. चवीला एकदम मस्त आणि करायला सोपा.
टॅग्स : गुरु पौर्णिमाअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.आध्यात्मिक