Join us   

Gudi Padwa Special : टम्म फुगलेल्या, अजिबात तेलकट नसलेल्या पुऱ्या करण्यासाठी ८ ट्रिक्स; परफेक्ट पुरी सोबत श्रीखंड भारी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 2:42 PM

1 / 9
गुढीपाडव्याला सर्वांच्याच घरी श्रीखंड पुरीचा बेत असतो. चपाती, भाकरी खाऊन कंटाळा आला की बदल म्हणून श्रीखंड खायला अनेकांना आवडतं. स्वादीष्ट, चवदार श्रीखंडाबरोबर पुरी खाण्याची मजाच काही वेगळी. पुऱ्या व्यवस्थित फुगत नाही तर तर कधी जास्त तेलकट होतात अशी अनेकींची तक्रार असते. परफेक्ट पुऱ्या बनवण्यासाठी काही सोप्या कुकींग ट्रिक्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. (How to make perfect puri)
2 / 9
१) पुरी फुगण्यासाठी चपातीच्या पिठात तेल किंवा तुपाचं मोहन घाला
3 / 9
२) पुऱ्यांचं पीठ मळल्यानंतर अर्ध्या तासासाठी झाकून ठेवून द्या. यामुळे पुरी कुरकुरीत होतील
4 / 9
३) पुऱ्या बनवण्यासाठी चपातीचं पीठ जास्त घट्ट मळू नका.
5 / 9
४) जर तुम्ही जास्त पुरी बनवत असाल तर पुरी लाटल्यानंतर एका प्लेटमध्ये पसरवून ठेवा आणि कापडानं झाका
6 / 9
५) पुरी तळण्यासाठी तेल व्यवस्थित तापलं असेल याची खात्री करा.
7 / 9
६) पुऱ्यांना सुकं पीठ लावू नका.
8 / 9
७) पुरी तळण्यासाठी छिद्र असलेल्या चमच्याचा वापर करा.
9 / 9
८) जर तुम्ही गरमागरम खाण्यासाठी पुरी तळत असाल तर मंद आचेवर तळा.
टॅग्स : कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्नगुढीपाडवा