Join us

श्रीखंडाला येईल केशराचा सुगंध आणि केशरी रंग, या पद्धतीने घाला केशर- श्रीखंड होईल मस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2025 16:32 IST

1 / 6
श्रीखंडामध्ये आपण केशर तर घालतो पण त्याला हवा तसा रंग आणि केशराचा सुगंध येत नाही.
2 / 6
कारण आपली श्रीखंडामध्ये केशर घालण्याची पद्धत थोडी चुकलेली असते..
3 / 6
बहुतांश घरांमध्ये केशराच्या काड्या गरम दुधामध्ये किंवा पाण्यामध्ये काही वेळ भिजवल्या जातात आणि नंतर ते दूध किंवा पाणी श्रीखंडामध्ये घातलं जातं. पण यामध्ये केशराचा सुगंध पदार्थाला खूप चांगल्याप्रकारे येत नाही.
4 / 6
म्हणूनच आता ही एक थोडी वेगळी रेसिपी ट्राय करून पाहा. यामध्ये थोडेसे केशर एका कागदात घ्या. त्या कागदाची व्यवस्थित घडी घाला.
5 / 6
हा कागद गरम तव्यावर ३० ते ३५ सेकंद ठेवा. यानंतर तो थंड झाला की त्याच्या आतमध्ये असणाऱ्या केशराच्या काड्यांचा हातानेच चुरा करा. हा चुरा अगदी चमचाभर पाण्यात टाका आणि आता हे पाणी श्रीखंडामध्ये घाला.
6 / 6
बघा या पद्धतीने जर तुम्ही श्रीखंडामध्ये केशर घातले तर श्रीखंडाला केशराचा मस्त हलका पिवळा रंग येईल आणि शिवाय त्याला केशराचा सुगंधही असेल.
टॅग्स : गुढीपाडवाअन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.