Join us

मे-जूनमध्ये ताजा ताजा लाल माठ खाणे अत्यंत फायद्याचे! ही पालेभाजी कमालीची पौष्टिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2025 18:13 IST

1 / 8
पालेभाज्या अत्यंत पौष्टिक असतात. त्या खायला अनेक जणांना आवडत नाहीत. मात्र कांद्यावर परतलेल्या पालेभाज्या चवीला अप्रतिम लागतात. आहारात पालेभाजी असायलाच हवी.
2 / 8
लाल माठाची भाजी महाराष्ट्रात तशी घरोघरी केली जाते. तांदळाच्या भाकरीसोबत ही भाजी अगदीच मस्त लागते. तसेच लाल माठाचे वरणही छान लागते आणि पौष्टिकही असते.
3 / 8
लाल माठाच्या भाजीत अनेक गुणधर्म असतात. त्यात भरपूर अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. जीवनसत्वे असतात.
4 / 8
लाल माठाची भाजीत लोह भरपूर असते. त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी लाल माठाचा उपयोग होतो. कमी रक्त, अशक्तपणा असे त्रास उद्भवत नाहीत.
5 / 8
लाल माठात बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स असतात. अँथोसायनिन्स असतात. जे पेशींसाठी चांगले असतात. त्यामुळे त्वचेसाठीही ही भाजी खावी.
6 / 8
या भाजीत जीवनसत्त्व 'ए' असते. त्यामुळे डोळ्यांसाठी लाल माठ चांगला ठरतो. दृष्टी चांगली शाबूत राहावी यासाठी ही भाजी नक्कीच खा.
7 / 8
पचनासाठी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे फायबर. अनेकांना फायबरची कमतरता असते. लाल माठ हा फायबरचा एक उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे आहारात ही भाजी असेल तर पचन चांगले होते.
8 / 8
लाल माठ थंड असतो. त्यामध्ये थंडावा असल्याने पोटासाठी तो चांगला आहे. उन्हाळ्याच्या दिवसाच लाल माठ खाणे फायद्याचे ठरते.
टॅग्स : अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.हेल्थ टिप्स