Join us

रोज खा दोन अक्रोड, मेंदू असा काही होईल तल्लख की तुम्ही सुसाट! पाहा ‘हे’ बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2025 16:39 IST

1 / 9
रोज दोन अक्रोड खाणे आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरते. सुकामेवा खाणे शरीरासाठी उपयुक्त असते. प्रत्येक पदार्थ वेगळ्या गुणधर्मांनी परिपूर्ण असतो. अक्रोडात काय असते ते जाणून घ्या.
2 / 9
रिकाम्या पोटी सकाळी दोन अक्रोड खाल्याने भुकेवर नियंत्रण राहते. त्यामुळे पोटाला आधार मिळतो. तसेच वजन कमी करण्यात मदत होते.
3 / 9
अक्रोड खाल्यामुळे बौद्धिक क्षमता वाढते. एकंदरीतच बौद्धिक आरोग्यासाठी चांगले ठेवण्यासाठी सुकामेवा खावा. जसे बदाम उपयुक्त ठरतात तसेच अक्रोडही उपयुक्त ठरतात.
4 / 9
त्वचेसाठी अक्रोड पोषक असतात. त्वचेचा पोत सुधारतो. अक्रोड असलेले फेसवॉश आणि इतर प्रॉडक्ट्सना आजकाल फार मागणी असते. कारण अक्रोड त्वचेसाठी फार चांगले असतात.
5 / 9
अक्रोडात ओमेगा-३ असते ते हृदयासाठी फार चांगले असते. त्यामुळे अक्रोड खाल्याने हृदयाचे कार्य सुरळीत होते.
6 / 9
अक्रोडात भरपूर फायबर असते. पचनासाठी फायबर फार गरजेचे आहे. त्यामुळे अक्रोड खाल्याने पचन सुरळीत होते. पोट साफ होते. गॅसचा त्रास होत नाही तसेच अपचन होत नाही.
7 / 9
अक्रोडात भरपूर अँण्टी ऑक्सिडंट्स असतात. तसेच अक्रोड जीवनसत्त्व 'ई' चा फार चांगला स्त्रोत आहे. त्वचेबरोबरच केसांसाठीही अक्रोड खाणे गरजेचे असते.
8 / 9
भिजवलेले अक्रोड खाणे मधुमेहासाठी फायदेशीर असते. रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी अक्रोड मदत करते.
9 / 9
अक्रोडात कॅल्शियम असते तसेच त्यात मॅग्नेशियम असते हाडांसाठी हे दोन्ही घटक फार गरजेचे असतात. त्यांचे शरीरातील प्रमाण कमी होऊ नये यासाठी अक्रोड खावेत.
टॅग्स : अन्नआरोग्यहेल्थ टिप्स