By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 14:44 IST
1 / 8दसऱ्या (Dussehra 2025) निमित्त अनेकांच्या घरात गोडधोड पदार्थ बनवले जातात. नेहमी बाहेरून आणण्यापेक्षा घरच्याघरी तुम्ही मऊसूत तोंडात टाकताच विरळघतील असे परफेक्ट गुलाबजामून बनवू शकता. ( 7 Tips For Gulab Jamun Making)2 / 8विकतसारखे मऊ, परफेक्ट गुलाबजाम होण्यासाठी काही खास टिप्स पाहूया. (Gulab Jamun Recipe)3 / 8गुलाबजामचे मिश्रण हलक्या हातानं मळा. पीठ जास्त दाबून मळू नका. कारण यामुळे ग्लुटेन सक्रिय होते. तळताना गोळे कडक होतात आणि भेगा पडतात. (Tips For Gulab Jamun Making)4 / 8गुलाबजामच्या पिठात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जास्त प्रमाणात वापरू नका. जास्त सोडा वापरल्यास गुलाबजाम तळताना फुटतात.5 / 8गुलाबजामचं पीठ मळताना त्यात दूध आणि पाणी वापरा. मिश्रण इतकं मऊ असावं त्याचे गोळे सहज वळता येतील आणि त्यात भेगा पडणार नाही.6 / 8गोळे तेलात घातल्यावर लगेच चमचा लावू नका. तुपाचा रंग थोडा बदलल्यावर तेलाल गोल फिरवा जेणेकरून गुलाबजामून समान तळले जातील. 7 / 8गुलाबजामचा पाक खूप गरम असेल तर आवरण कडक होईल. पाक खूप थंड असेल तर गुलाबजाम पाक शोषून घेणार नाही.8 / 8गुलाबजाम पाकात घातल्यानंतर कमीत कमी ३ ते ४ तास पाकात भिजवा ज्यामुळे आतून पूर्णपणे ज्युसी होतील.