Join us

पाहा ‘ही’ ७ अत्यंत मोलाची फळं, त्यांची सालं म्हणजे लाखमोलाची गोष्ट! फेकली तर १०० % पस्तावाल..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2025 20:03 IST

1 / 10
सर्वच फळांना सालं असतात. काहींची सालं आपण खातो, काहींची साले सोलून टाकून देतो आणि फक्त गर खातो. तसेच अनेक भाज्यांनाही सालं असतात. ती ही सोलून टाकून देतो.
2 / 10
काही फळांची सालं ही विविध प्रकारे वापरता येतात. ती टाकायची गरज नाही.
3 / 10
असे पदार्थ जाणून घ्या, ज्यांच्या सालांचाही वापर करता येतो. त्वचेसाठी, खाण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी त्यांचा वापर होतो.
4 / 10
संत्र आपण सोलूनच खातो. संत्र्याच्या सालांचा वापर त्वचेसाठी करता येतो. संत्र्‍याची साले वाळवून ठेवायची नंतर ती अनेक प्रकारे वापरता येतात. स्वच्छतेसाठीही वापरता येतात.
5 / 10
केळ्याच्या सालांचा हेअर मास्क तयार करता येतो. केसांच्या आरोग्यासाठी तो फार चांगला असतो. ही सालं चेहऱ्यावर घासल्याने टॅनिंगही कमी होते.
6 / 10
काकडीच्या सालांमध्येही विविध गुणधर्म असतात. त्या सालांचा वापर चेहऱ्यासाठी करता येतो. तसेच त्वचेवर जर उन्हामुळे डाग आले असतील तर, ही सालं चोळून डाग कमी करता येतात.
7 / 10
कलिंगडाच्या सालाची भाजी तयार करता येते. चवीला छान लागते. तयार करायलाही फार सोपी असते.
8 / 10
बटाट्याची साले चेहर्‍यासाठी तसेच त्वचेसाठी चांगली असतात . त्यामध्ये फायबर असते. पोटॅशियम असते.
9 / 10
सफरचंदाच्या सालांचाही चेहर्‍यासाठी उपयोग करता येतो. त्यामध्ये अरसोलिक अॅसिड असते. ज्याचा उपयोग वजन कमी करण्यासाठी होतो.
10 / 10
पडवळाच्या सालापासून चविष्ट अशी चटणी तयार करता येते. अगदी साधी फोडणी देऊन ही चटणी तयार होते.
टॅग्स : फळेभाज्याअन्नहोम रेमेडी