1 / 7पोहे करताना एखादी भाजी करताना त्यात चवीसाठी आपण शेंगदाणे घालतो. मात्र शेंगदाणे आहारात असणे फार चांगले असते. अनेक पौष्टिक पदार्थांपैकी शेंगदाणे एक आहे. मात्र आपल्याला शेंगदाण्याचे महत्व माहितीच नसते. आवड म्हणून खातो. 2 / 7आहारात शेंगदाण्यांचा समावेश नसेल तर तो नक्कीच करुन घ्यावा. काही आरोग्यदायी फायदे शेंगदाणे खाल्याने मिळतात. शेंगदाण्यांमुळे पित्त वाढते म्हणून आपण ते खाणे टाळतो. मात्र शेंगदाणे अति खाल्यानेच पित्ताचा त्रास होतो. कोणताही पदार्थ जास्त खाणे आरोग्यसाठी वाईटच. 3 / 7शेंगदाण्यात भरपूर प्रथिने असतात. तसेच फायबर असते. त्यात निरोगी फॅट्स असतात. वजन कमी करण्यासाठीच्या डाएटमध्येही शेंगदाणे उपयुक्त ठरतात. शेंगदाण्याचा वापर करुन विविध पदार्थ तयार करु शकता. शेंगदाण्याचे तेल घरी वापरु शकता. 4 / 7शेंगदाण्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण शेंगदाण्यामुळे झटकन वाढत नाही. मधुमेहाचा त्रास आजकाल फार कॉमन झाला आहे. साखरेची पातळी नियंत्रित राहावी यासाठी शेंगदाण्याची मदत होते. 5 / 7शेंगदाण्यांमध्ये व्हिटॅमिन (B1) थायमिन आणि नियासिन (B3) असते, जे मेंदूच्या कार्यासाठी फार आवश्यक आहेत. स्मरणशक्ती चांगली राहावी आणि मेंदू तल्लख राहावा यासाठी शेंगदाणे खाणे फायद्याचे ठरते. 6 / 7शेंगदाण्यात मॅग्नेशियम असते. त्यात फॉस्फरस असते तसेच झिंक असतेय. त्यामुळे हाडांसाठीही शेंगदाणे चांगले. शेंगदाण्याच्या तेलाने मालीश केले जाते. त्याचे कारणही हेच आहे. 7 / 7शेंगदाण्यांमध्ये रेस्व्हेराट्रॉल, फ्लावोनॉइड्स आणि व्हिटॅमिन 'इ' सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात. शरीरासाठी ते फायद्याचे असतात. तसेच अँटीऑक्सिडंट्स केसांसाठी व त्वचेसाठीही उपयुक्त ठरतात.