Join us

बुंदी रायते आवडते ना, मग ‘या’ पद्धतीने करुन पाहा, उन्हाळ्यात खा मस्त स्मोकी रायत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 18:12 IST

1 / 8
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काही पदार्थ घरोघरी हमखास केले जातात. शरीराला थंडावा देणारे पदार्थ खाणे गरजेचे असते. दह्याचा समावेश असलेले पदार्थ खाणे फायद्याचे ठरते.
2 / 8
विविध प्रकारच्या कोशिंबीर खाणे तसेच रायता खाणे शरीरासाठी उपयुक्त असते. विविध प्रकारचा रायता करतात. त्यातीलच एक प्रकार म्हणजे बुंदी रायता. चवीला मस्त असतोच आणि करायलाही सोपा.
3 / 8
एका खोलगट पातेल्यामध्ये दही घ्या. चमच्याने ते व्यवस्थित फेटून घ्या. त्यामध्ये चवीपुरते मीठ घाला. लाल तिखट घाला.
4 / 8
कोथिंबीर मस्त बारीक चिरुन घ्या. दह्याच्या मिश्रणामध्ये कोथिंबीर घाला. उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर खाणे पचनासाठी फायद्याचे असते.
5 / 8
भरपूर बूंदी त्या दह्यामध्ये घाला. लाल बूंदी आवडत असेल तर ती वापरा जर पिवळी आवडते तर पिवळी वापरा. कोणतीही बूंदी घेऊ शकता. बूंदी सॉलटेड असते त्यानुसारच मीठ घाला.
6 / 8
एका मातीच्या पणतीमध्ये चमचाभर तेल घाला. गॅसवरती पणती ठेवा त्यामध्ये तेल घाला. तेलामध्ये कडीपत्याची फोडणी करुन घ्या. त्यामध्ये मोहरी घाला, जिरे घाला. हिंग घाला तयार फोडणी रायत्यामध्ये ओता. पणतीसकट टाका. पणतीमुळे रायत्याला स्मोकी चव येते.
7 / 8
रायता तयार झाल्यावर त्यामध्ये बर्फ घाला किंवा गार पाणी ओता. अति पातळ करु नका. रायता गारच छान लागतो.
8 / 8
त्यामध्ये तुम्हाला आवडत असणारे मसालेही घालू शकता. जिरे पूड धणे पूड घालू शकता. काही जण चाट मसाला घालतात. आमचूर घालतात. तुम्हाला जे आवडते त्यानुसार रायता तयार करा.
टॅग्स : समर स्पेशलअन्नपाककृतीआहार योजना