Diwali special : माव्याचे करा ८ पदार्थ, एकदाच मावा आणा आणि रोज करा खास मस्त पदार्थ
Updated:October 15, 2025 17:24 IST2025-10-15T17:20:20+5:302025-10-15T17:24:33+5:30
Diwali special: Make 8 dishes with mawa, make special delicious dishes every day : माव्याचे खास चविष्ट पदार्थ. करायला सोपे.

माव्याचे विविध पदार्थ करता येतात. दिवाळीत माव्याचे झटपट करता येणारे हे ८ पदार्थ पाहा. करायला सोपे असतात तसेच सगळ्यांच्याच आवडीचे आहेत. लहान ते मोठे सारेच मनापासून खातील.
मावा बर्फी करायला अगदी सोपी. विकत फार महाग मिळणारा हा पदार्थ घरीच करा. साखर, दूध, वेलची पूड, वेलदोडे असे पदार्थ घालून मस्त मऊसर बर्फी करता येते.
गुलाबजाम हा फार लोकप्रिय असा गोडाचा पदार्थ आहे. हे गुलाबजाम छान मऊ आणि जिभेवर विरघळणारे व्हावेत यासाठी छान ताजा मावा घ्यावा.
मावा केक भारतात प्रसिद्ध आहे. बेकारीमध्येही आरामात उपलब्ध होतो. तसेच घरीही करता येतो. नक्की करुन पाहा.
माव्याचा लाडू करतात. दिवाळीमध्ये फराळासाठी विविध प्रकारचे लाडू केले जातात. यंदा असा माव्याचा लाडू करुन पाहा. सगळ्यांना नक्कीच आवडेल.
कलाकंद हा पदार्थ मिठाईच्या दुकानात असतोच. कारण हा फार मागणी असलेला पदार्थ आहे. तसेच कलाकंद घरी करणेही सोपे आहे.
माव्याचे गोड शंकरपाळे करता येतात. फराळासाठी खास असा हा पदार्थ नक्की करा. त्यात दूध, साखर घालून त्याची चव वाढवता येते.
मावा पेढा म्हणजे मऊ, गोड आणि पारंपरिक असा पदार्थ. करायला सोपा आणि मुळात सगळ्यांच्या आवडीचा असतो.
मावा कचोरी केली जाते. ही कुरकुरीत कचोरी साखरेच्या पाकात बुडवली जाते. त्यात भरपूर सुकामेवा घालायचा, त्यात गुलाबाच्या पाकळ्याही घालू शकतात.